युवती म्युझिक'चा "बावरी साद' लॉंच 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

मुंबई : नव्या पिढीचे संगीतकार, गायकांना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी प्रमोद वाघमारे यांनी "युवती म्युझिक' कंपनीची स्थापना केली आहे. "बावरी साद' या गाण्याद्वारे ही कंपनी संगीत क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्यांचा हा पहिलावहिला म्युझिक व्हिडीओ दादर येथील प्लाझा चित्रपटगृहात लॉंच करण्यात आला. 

"बावरी साद' या प्रेम गीतातून एक कथा उलगडणार आहे. शिक्षणासाठी परदेशी जाणारी एक मुलगी आणि तिचा प्रियकर यांच्यातील हळुवार नात्याचा वेध गीतांतून घेण्यात आला आहे. परदेशी जाण्याच्या विचाराने होणाऱ्या विरहाने ती मुलगी सैरभैर झाली आहे. त्या दोघांमधील नात्याचे काय होते, याचे चित्रण या म्युझिक व्हिडीओत करण्यात आले आहे. शलाका देशपांडे यांनी लिहिलेल्या या गाण्याला नीतेश मोरे यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्यातून नव्या दमाचे गीतकार आणि संगीतकार रसिकांपुढे येत आहेत. या म्युझिक व्हिडीओचे दिग्दर्शन रिशव अगरवाल, चित्रीकरण मयूर बराधे यांनी केले आहे. गायक मंगेश बोरगावकर, कीर्ती किल्लेदार यांनी गाणे गायले आहे. 
मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या कलाकारांना स्वबळावर कलाकृती निर्माण करणे शक्‍य नसते. हे पाठबळ देण्याचे काम "युवती म्युझिक' करत आहे. त्याच्या पाठबळानेच माझे पहिले गाणे सादर होत आहे, असे संगीतकार नीतेश मोरे यांनी सांगितले. करिअर उभे राहण्यासाठी, आत्मविश्वास येण्यासाठी अशी संधी मिळणे आवश्‍यक असते. युवती संगीत हीच संधी नव्या दमाच्या कलाकारांना देणार आहे. नव्या कलाकारांसाठी हा महत्त्वाचा मंच ठरेल', असेही मोरे यांनी सांगितले. 
प्रमोद वाघमारे यांनी सांगितले की, "आताच्या पिढीचे संगीत, जाणिवा वेगळ्या आहेत. त्यांना चांगला मंच देण्याची गरज आहे. "युवती म्युझिक' ही गरज पूर्ण करणार आहे.  
 
Web Title: yuvati music bawari sad music albm launch