'सिक्सरकिंग' युवराज अडकणार लग्नाच्या बेडीत

वृत्तसंस्था
बुधवार, 30 नोव्हेंबर 2016

चंदीगड (पंजाब)- 'सिक्सरकिंग' युवराजसिंग आज (बुधवार) लग्नाच्या बेडीत अडकणार असून, बॉलिवूड अभिनेत्री हेजल किच हिच्यासोबत विवाहबद्ध होत आहे.

गुरद्वार फतेहगढ साहिब येथे विवाह पार पडल्यानंतर हॉटेल ललित येथे स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मोहाली येथे झालेल्या कसोटी सामन्यात विजय साकार करणारा भारतीय संघ युवराजच्या स्वागत समारंभाला उपस्थित राहणार आहे. शिवाय, बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावणार आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) युवराजसिंगला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, युवराजसिंगने इस्ताग्रामवरून दोघांची छायाचित्रे अपलोड केली आहेत.

Web Title: Yuvraj Singh begins new innings with bollywood actress Hazel Keech