लहानपणापसूनच मला नृत्याची आवड होती. ही आवड जपण्यासाठी विविध व्हिडिओ आणि इंटरनेटच्या माध्यमातून मी डान्स शिकले. खरेतर डान्समुळेच आज मी या क्षेत्रात आले. मी सुरुवातीला छोटेछोटे स्टेज शो आणि इव्हेंट्स केले. त्यानंतर मला मराठी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. ती मालिका होती ‘बाजीराव मस्तानी’. त्यानंतर मी एका रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला. या रिॲलिटी शोमध्ये मी अंतिम फेरीपर्यंत पोचले होते. नंतर मला मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ही सुरुवात माझ्यासाठी यशाची पायरी ठरली, कारण त्यानंतर मला काम मिळत राहिले.

मला अभिनयापेक्षा डान्सची आवड अधिक होती, म्हणूनच अभिनय क्षेत्रात काम करत असताना मी डान्सला जास्त प्राधान्य दिले. या कलेमुळे कित्येक आयटम साँग करण्याची संधी मला मिळाली. हे काम करत असताना मला नेहमी माझ्या मित्रांनी आणि इतर काही लोकांनी हाच प्रश्न विचारला, की तू हे काम का करत आहेस?’, ‘आयटम साँगमध्ये कसले करिअर?’ अशा लोकांना मी माझ्या कामातून उत्तर दिले. मला विविध आयटम साँगसाठी ऑफर मिळत राहिल्या. ‘लई भारी फटका’, ‘चंपा बाई’, ‘ईश्काची गाडी’, ‘दिल ऐसा हे मेरा’सारख्या वेगवेगळ्या अल्बममध्ये मी काम केले.
माझे आई-वडील मला नेहमी सहकार्य करतात. त्यांनी मला हवे ते क्षेत्र आणि हवे ते काम करण्याची संधी दिली. मला नेहमी इतर नातेवाइकांकडून माझ्या कामाबद्दल आणि माझा कपड्यांवरून बोलणी खावी लागली, मात्र माझ्या पालकांनी मला कोणत्याही कामासाठी कधीच रोखले नाही. ‘तुम्हाला जी गोष्ट आवडते ती करावीच,’ हा विचार करत मी सातत्याने काम करत राहिले.
मला जीम आणि बाईक राइडिंगची सुद्धा आवड आहे. कामातून वेळ काढून मी नेहमी बाईक राइडिंग करते, तसेच दरवर्षी मी ट्रेकिंगसाठी जाते. सध्या मी एका वेबसीरिजची तयारी करत आहे. त्याचबरोबर पुढच्या वर्षी माझे आणखी एक आयटम साँग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
(शब्दांकन - अक्षता पवार)