लॉकडाऊनमध्ये अनुभवा 'टॉकीज प्रीमियर लीग'ची मेजवानी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 April 2020

यावर्षी उद्भवलेल्या जागतिक महामारीच्या या संकटात 'झी टॉकीज'वरील टॉकीज प्रीमियर लीग, मनोरंजनाची मेजवानी सादर करणार आहे. ही लीग ५ एप्रिल रोजी सुरु होणार असून, दर रविवारी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता एक नवीन दर्जेदार मराठी चित्रपट पाहण्याची संधी यामुळे मिळणार आहे.

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाचा परिणाम म्हणून, भारताच्या माननीय पंतप्रधानांकडून, २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे. एक सामाजिक बांधिलकी आणि स्वरक्षण म्हणून, हा लॉकडाऊन आपण पाळायलाच हवा. असे असताना, मराठी मनोरंजन सृष्टीतील 'झी टॉकीज'ने टॉकीज प्रीमियर लीगची घोषणा केली आहे. 

coronavirus: गायिका कनिका कपूरच्या कुटुंबियांचा धक्कादायक खुलासा

यावर्षी उद्भवलेल्या जागतिक महामारीच्या या संकटात 'झी टॉकीज'वरील टॉकीज प्रीमियर लीग, मनोरंजनाची मेजवानी सादर करणार आहे. ही लीग ५ एप्रिल रोजी सुरु होणार असून, दर रविवारी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता एक नवीन दर्जेदार मराठी चित्रपट पाहण्याची संधी यामुळे मिळणार आहे. कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी घरी थांबण्याची वेळ आलेली असली, तरीही घरबसल्या मनोरंजनासाठी 'झी टॉकीज'वर ९ उत्कृष्ट मराठी चित्रपट पाहायला मिळणार आहेत.५ एप्रिल ते ३१ मे दरम्यान पार पडणार असलेल्या 'टॉकीज प्रीमियर लीग'मध्ये विनोदी, थरारक, रोमँटिक, हॉरर इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम व नवीन चित्रपट पाहायला मिळणार आहेत. एक गूढरम्य रहस्य उलगडणाऱ्या 'तुंबाड' या चित्रपटापासून 'टॉकीज प्रीमियर लीग'ला सुरुवात होईल.

Tumbbad Movie (2018) | Reviews, Cast & Release Date in Pune ...

नवनाथांची महती सांगणारा भक्तीपट 'बोला अलख निरंजन' आणि प्रेक्षकांना एका सुंदर ठिकाणाची सैर घडवणारा 'हंपी', एवढेच नाही तर, एका 'टॉकीज ओरिजिनल' चित्रपटाचा सुद्धा या लीगमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 'झी टॉकीज'ची निर्मिती असलेला 'आलटून पालटून' हा हॉरर विनोदीपट प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करेल. बहीण-भावाची जोडगोळी असलेला 'खारी-बिस्कीट' आणि त्यानंतर 'टकाटक' ही रोमँटिक कॉमेडी झी टॉकीजवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 'दाह' हा सिनेमा त्यापुढील रविवारी पाहता येईल. या सर्व उत्तम चित्रपटांनंतर, 'फत्तेशिकस्त' हा सुपरहिट सिनेमा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोनेरी इतिहासातील काही घटनांवर हा सिनेमा प्रकाश टाकतो.

Khari Biscuit Movie Show Times | SHMOTI

एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या काळात अशोक सराफ, भाऊ कदम, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, अनिता दाते, सोहम शाह, ललित प्रभाकर, सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, प्रथमेश परब आणि रितिका श्रोत्री असे सारे कलाकार आपल्या भेटीला येणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा, 'झी टॉकीज' वाहिनीवर प्रेक्षक आपल्या कुटुंबासोबत हे चित्रपट पाहून टॉकीज प्रीमियर लीगचा आनंद घेऊ शकतात.

टॉकीज प्रीमियर लीग बद्दल बोलताना, 'झी टॉकीज'चे बिझनेस हेड बवेश जानवलेकर म्हणतात; "शासनाकडून आपल्या हितासाठी, लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 'टॉकीज प्रीमियर लीग'च्या माध्यमातून, तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत, हा वेळ आनंदाने घालवू शकता. लोकांच्या मनोरंजनात अडथळा येऊ नये, याची काळजी 'झी टॉकीज' घेत आहे. एप्रिल आणि मे महिन्यातील दर रविवारी एक दर्जेदार मराठी चित्रपट, 'टॉकीज प्रीमियर लीग'मध्ये बघता येणार आहे. हे सर्व चित्रपट उत्तम दर्जाचे आणि विविध धाटणीचे असतील. प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन व्हायला हवे, यासाठी, त्यांच्या आवडीचे उत्कृष्ट चित्रपट 'झी टॉकीज' वाहिनी त्यांच्यासाठी घेऊन येत आहे."
 

zee talkies decided to display talkies premier league  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: zee talkies decided to display talkies premier league