लवकरच झी युवा संगीत सम्राटची धूम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक मधील स्पर्धकांच्या अभूतपूर्व प्रतिसादांनंतर झी युवाची संगीत सम्राटाची टीम आता कला आणि संस्कृतीने बहरलेल्या पुण्यात दाखल झाली आहे. या ऑडिशन बुधवार 10मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 2 या दरम्यान ज्ञानसागर इन्स्टिट्यूट मॅनजेमेंट आणि रिसर्च, एस के पी कॅम्पस, बाणेर-बालावाडी रोड, लक्ष्मण नगर बाणेर पुणे योथे होणार आहेत. ज्या प्रमाणे इतर शहरांमधील गुणी स्पर्धक निवडले गेले त्याचप्रमाणे पुण्यातील कलेची योग्य पारख करून झी युवा सम्राट स्पर्धेची निवड प्रक्रिया पूर्ण करेल.
 
गायकांबरोबरच विविध वादक, तोंडाने आवाज काढणारे कलाकर अशा सगळ्यांना देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने सादरीकरणाची संधी मिलमार आहे. त्यामुळे या कार्यक्रमात समुहानाने देखील सहभागी होता येणार आहे. वयाच्या 4 वर्षांपासून ते आयुष्याच्या  कोणत्याही वयातील मराठी बोलणारे कलाकार या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. 

ढोलपथके, बँड, गावागावातील संगीत, प्रत्येक प्रकारचं संगीत या कार्यक्रमात पाहायला मिळेल. महाराष्टात ज्यांच्या रक्तात संगीत आहे त्यांच्यासाठी ही एक मोठी परवणी आहे. 

स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेल्या स्पर्धकांना यासाठी कोणतेही पैसे भरयाचे नसून, स्पर्धेच्या ठिकाणी केवळ नावनोंदणी करायची आहे. ज्याच्यापासून संगीत निर्मिती होऊ शकते अशी वाद्ये किंवा अश्या वस्तू स्पर्धक घेऊन येऊ शकतात.  
 
संगीत सम्राट हा कार्यक्रम अनेक कारणांमुळे वेगळा ठरणार आहे. छोट्या पडद्यावर या प्रकारचा टॅलेंट हंट आजपर्यंत झालेला नाही. पुण्यानंतर संगीत सम्राटची टीम 12 मे रोजी कोल्हापूरमध्ये खासबाग मधील प्रायव्हेट हायस्कूल आणि 14 मे रोजी मुंबईमध्ये  ब्राम्हण शिक्षण मंडळ प्राथमिक विद्यालय नौपाडा ठाणे येथे या ऑडिशन्स घेतल्या जाणार आहेत. 

झी युवाच्या संगीत सम्राट या टॅलेन्ट हंट कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर आणि नावाजलेले गायक आदर्श शिंदे हे परिक्षक म्हणून असणार आहेत.

Web Title: zee yuva sangeet samrat