आज ठरणार महाराष्ट्राचा पहिला "संगीत सम्राट"

टीम ई सकाळ
रविवार, 6 ऑगस्ट 2017

या सर्वांमधून नंदिनी अंजली , इशिता विश्वकर्मा , मानस गोसावी , संगीत फॅक्टरी , इमोशन्स बँड  , प्रथमेश मोरे , रवींद्र खोमणे आणि दंगल गर्ल्स  हे ८ फायनलिस्ट निवडले गेले आहेत .  या ८ उत्कृष्ट स्पर्धकांतून महाराष्ट्राचा पहिला संगीत सम्राट निवडला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्याची वाट बघत आहेत तो अंतिम महासोहळा दिनांक ६ ऑगस्ट ला संध्याकाळी ७ वाजता झी युवावर पाहायला मिळेल .

मुंबई : झी युवावरील '"संगीत सम्राट या अनोख्या संगीतमय कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांवर संगीताची मोहिनी घातली आहे. सोमवार ते शुक्रवार रोज रात्री ९ वाजता येणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये भरपूर लोकप्रिय झाला आहे आणि त्यामुळे घराघरामध्ये हा कार्यक्रम पाहिला जाऊ लागला. सूर, लय आणि ताल यांचा सुरेख संगम संगीत सम्राट या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्राला पहायला मिळाला. महाराष्ट्राच्या संगीत परंपरेचा मोठा वारसा झी युवा या वाहिनीने संगीत सम्राट या कार्यक्रमाद्वारे पुढे नेला.

 महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले अनेक गायक, वादक आणि ज्यांच्या श्वासात संगीत आहे अशा अनेक कलावंतानी संगीत सम्राटाच्या व्यासपीठाद्वारे मराठी रसिकांसमोर त्यांची कला सादर केली. महाराष्ट्राचा आघाडीचा गायक आदर्श शिंदे याने सूर ताल आणि लय या मुद्द्यांद्वारे कलाकारांचे परीक्षण केले तर मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची नायिका क्रांती रेडकर वानखडे कलाकारांच्या परफॉर्मन्स किती मनोरंजनात्मक आहेत हे पहिले. त्याच प्रमाणे तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांनी निवेदनाची भूमिका उत्तम सांभाळली.

आधुनिक आणि पारंपरिक संगीताचा अनोखा मेळ या कार्यक्रमामुळे रसिक प्रेक्षकांना पाहण्याची पर्वणी झी युवाने “संगीत सम्राट" या कार्यक्रमामुळे मिळाली . आता हा कार्यक्रम त्याच्या अंतिम चरणावर पोहचला आहे या कार्यक्रमासाठी झी युवा या वाहिनीने महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला. त्यात झी युवा ने आणलेल्या या संधीच सोनं करत संगीत कलाकारांनी महाराष्ट्रातील ६ शहरांमध्ये घडलेल्या निवडचाचणी मध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली .या सर्व स्पर्धकांमधून सर्वप्रथम १५० स्पर्धक निवडले गेले , त्यांनतर ६० , २४ , १२ असे उत्तमोत्तम स्पर्धकी निवडले गेले.

आता या सर्वांमधून नंदिनी अंजली , इशिता विश्वकर्मा , मानस गोसावी , संगीत फॅक्टरी , इमोशन्स बँड  , प्रथमेश मोरे , रवींद्र खोमणे आणि दंगल गर्ल्स  हे ८ फायनलिस्ट निवडले गेले आहेत .  या ८ उत्कृष्ट स्पर्धकांतून महाराष्ट्राचा पहिला संगीत सम्राट निवडला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्याची वाट बघत आहेत तो अंतिम महासोहळा दिनांक ६ ऑगस्ट ला संध्याकाळी ७ वाजता झी युवावर पाहायला मिळेल .

Web Title: zee yuva sangeet samrat esakal news