किशोर कदम यांचे घडणार 'विराट' दर्शन

टीम ई सकाळ
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

नुकतेच प्रदर्शित झालेले ‘जिंदगी विराट’ या चित्रपटाचे पोस्टर बघताच क्षणी लक्षात येतो तो चित्रपटाचा ‘सेलिब्रेशन मूड’! जगण्याची बाप गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अभिनेते किशोर कदम अतरंगी वेशभूषांमध्ये दिसत आहेत. विष्णूच्या दशावतारी प्रतिमेप्रमाणे भासणाऱ्या किशोर कदम यांच्या वॉचमन, फकीर, रॉकस्टार, विदुषक अशा विविध अवतारांकडे बघून या चित्रपटात ते नेमक्या किती भूमिका सकारात आहेत असा प्रश्न पडल्यास आश्चर्य वाटायला नको.

मुंबई : नुकतेच प्रदर्शित झालेले ‘जिंदगी विराट’ या चित्रपटाचे पोस्टर बघताच क्षणी लक्षात येतो तो चित्रपटाचा ‘सेलिब्रेशन मूड’! जगण्याची बाप गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अभिनेते किशोर कदम अतरंगी वेशभूषांमध्ये दिसत आहेत. विष्णूच्या दशावतारी प्रतिमेप्रमाणे भासणाऱ्या किशोर कदम यांच्या वॉचमन, फकीर, रॉकस्टार, विदुषक अशा विविध अवतारांकडे बघून या चित्रपटात ते नेमक्या किती भूमिका सकारात आहेत असा प्रश्न पडल्यास आश्चर्य वाटायला नको.

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये भाऊ कदम, ओम भूतकर, उषा नाईक, अतुल परचुरे, सुमित संघमित्र हे सगळे खूप वेगळ्या ढंगात आणि ‘बर्थडे सेलिब्रेशन मूड’ मध्ये दिसत आहेत. पण हे बर्थडे सेलिब्रेशन नक्की कोणासाठी आहे हे कळण्यासाठी मात्र चित्रपटाच्या ट्रेलरची वाट बघायला लागणार आहे.

अंजनेय साठे एंटरटेनमेंट निर्मित ‘जिंदगी विराट’ हा दिग्दर्शक सुमित संघमित्र यांचा पहिलाच चित्रपट असून पोस्टरमुळे या चित्रपटाच्या कथानकाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण होत आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'जिंदगी विराट’ या चित्रपटाविषयी अजून एक्सायटिंग अपडेट्स जाणून घेण्यासाठी चित्रपटाच्या फेसबुक पेजला नक्की भेट द्या.

Web Title: zindagi virat official poster esakal news