एकाच फ्रेममध्ये दिसल्या 'झिंगाट गर्ल्स'

वृत्तसंस्था
Tuesday, 15 October 2019

रिंकूने नुकतच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास फोटो शेअर केला आहे आणि सध्या हा फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

मुंबई : रिंकू राजगुरु ही घराघरात पोहोचली ती 'सैराट' या चित्रपटामुळे. अख्ख्या महाराष्ट्राला ताल धरायला लावण्याऱ्या 'सैराट'ने लोकांना अक्षरश: झिंगाट केलं. रिंकू आणि आकाश ठोसर या दोन नव्या चेहऱ्यांना चित्रपटसृष्टीमध्ये जागा निर्माण करुन दिली ती 'सैराट'नेच.

बॉलिवूडलाही याचा मोह आवरला नाही आणि हिंदीमध्येही 'सैराट'चा रिमेक करण्यात आला. जान्हवी कपूर आणि इशान खट्टर या नव्या चेहऱ्यांनीही 'धडक'सह बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज तीन वर्षांनंतरही 'सैराट'ची लोकप्रियता कायम आहे. 

'धडक'ने बॉक्सऑफिसवर चागंली कमाई केली नसली, तरी जान्हवी आणि इशानच्या कामाची चर्चा झालीच. करण जोहरने या 'सैराट' चा रिमेक केला. 'धडक'ने बॉक्सऑफिसवर चांगला आकडा गाठला नसला, तरी या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांवर जादू केली. 

- काँग्रेस नेत्याच्या मुलीचे हॉट फोटो चर्चेत, तुम्ही पाहिले का?

रिंकूने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास फोटो शेअर केला आहे आणि सध्या हा फोटो इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. सैराट आणि धडकमधील 'झिंगाट गर्ल्स' जान्हवी आणि रिंकू फोटोमध्ये गळाभेट घेताना दिसत आहेत. रिंकू सुंदर अशा काळ्या कुरत्यामध्ये दिसतेय, तर जान्हवी टी-शर्ट आणि निळ्या रंगाच्या जिन्समध्ये 'सिंपल' आणि 'क्यूट' दिसत आहे. रिंकूने हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'जेव्हा सैराट धडकला भेटते'. 

- तापसी पन्नूची बहिणही दिसते तितकीच सुंदर ; पाहा फोटो

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 #sairatmetdhadak.

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

जान्हवी सध्या गुंजन सक्सेना यांच्या 'द कारगिल गर्ल' चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. जान्हवी महिला वैमानिकाच्या भूमिकेत दिसणार असून हा चित्रपट पुढील वर्षी 13 मार्चला प्रेत्रकांच्या भेटीला येणार आहे. रिंकूचा 'कागर' हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. जान्हवी आणि रिंकू यांच्या भेटीविषयीही सध्या बी-टाऊनमध्ये चर्चा होताना दिसतेय. या दोघी कोणत्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार का? अशी उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. 

- सोफी चौधरी आणि क्रिती सॅनन देत आहेत एकमेकांना खुन्नस कारण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zingat girls Rinku Rajguru and Janhvi Kapoor met together see picture