#MarathaKrantiMorcha 'बामसेफ'चा मराठा आरक्षणास पाठिंबा!

प्रा.भगवान जगदाळे
Sunday, 29 July 2018

मराठा आरक्षणास धुळे जिल्हा बामसेफ युनिटने काल (ता.28) लेखी पाठींबा जाहीर केला. 'बामसेफ'चे धुळे जिल्हाध्यक्ष प्रा. मोहन मोरे यांनी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी मनोज मोरे यांना पाठिंब्याचे पत्र दिले. तसेच सदर पत्राचे वाचनही प्रा. मोरे यांनी केले. यावेळी 'बामसेफ'चे महाराष्ट्र राज्याध्यक्ष रविंद्र मोरे, उपाध्यक्षा प्रणाली मराठे, राजेश गायकवाड, नरेंद्र खैरनार, आसिफ अन्सारी, ऍड. प्रसेनजीत बैसाणे, सुरेश मोरे, विनय सुर्यवंशी, नितीन खैरनार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवराय, शाहू-फुले-आंबेडकरांचा जयघोषही यावेळी करण्यात आला.

निजामपूर (धुळे) : मराठा आरक्षणास धुळे जिल्हा बामसेफ युनिटने काल (ता.28) लेखी पाठींबा जाहीर केला. 'बामसेफ'चे धुळे जिल्हाध्यक्ष प्रा. मोहन मोरे यांनी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी मनोज मोरे यांना पाठिंब्याचे पत्र दिले. तसेच सदर पत्राचे वाचनही प्रा. मोरे यांनी केले. यावेळी 'बामसेफ'चे महाराष्ट्र राज्याध्यक्ष रविंद्र मोरे, उपाध्यक्षा प्रणाली मराठे, राजेश गायकवाड, नरेंद्र खैरनार, आसिफ अन्सारी, ऍड. प्रसेनजीत बैसाणे, सुरेश मोरे, विनय सुर्यवंशी, नितीन खैरनार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. छत्रपती शिवराय, शाहू-फुले-आंबेडकरांचा जयघोषही यावेळी करण्यात आला.

"महाराष्ट्रातील मराठा समाज हा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मोर्चे व आंदोलने करत आहे. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ही संविधानाने घातली नसून सर्वोच्च न्यायालयाने घातली आहे. ही मर्यादा संसदेत कायदा करून रद्द होऊ शकते. तसे झाल्यास मराठा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळू शकते. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे," असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MarathaKrantiMorcha BAMCEF support Maratha reservation