
मराठा आरक्षण आंदोलनाची धग कायम आहे आज ता. 28 मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे अकोला रिसोड या बसवर आंदोलकांनी दगडफेक केल्याने बसच्या काचा फुटल्या आहेत.
वाशीम: मराठा आरक्षण आंदोलनाची धग कायम आहे आज ता. 28 मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथे अकोला रिसोड या बसवर आंदोलकांनी दगडफेक केल्याने बसच्या काचा फुटल्या आहेत.
मराठा आरक्षण आंदोलनाची धग ग्रामीण भागात तिव्र होत आहे. शिरपूर बसस्थानकावर रिसोड अकोला ही रिसोड आगाराची बस उभी असतांना आंदोलकांनी बसवर तुफान दगडफेक केली. यामधे कुणी जखमी झाले नसले तरी शहरात तणाव निर्माण झाला आहे.