
कौतुकास्पद उपक्रम
कौतुकास्पद उपक्रम
शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यानेच नोकऱ्यांसह अन्य प्रश्न निर्माण झाले आहेत. शिक्षण नसल्याने आत्मविश्वासाचा अभाव आहे. त्यामुळेच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याकडे समाजाने लक्ष देण्याची गरज आहे. आतापर्यंत काही करता आले नाही. आता किमान पुढील पिढीसमोर जटिल समस्या निर्माण होऊ नये, हे पाहणे आवश्यक आहे. त्यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षण द्यावे लागणार आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी त्यापैकी किती जण पात्र आहेत, हा एक प्रश्नच आहे. आज नोकऱ्या आहेत; मात्र त्यासाठी कौशल्य विकासावर आधारित शिक्षण घेतले नसल्याने नोकरी मिळत नाही. "सकाळ'ने बदल घडविण्यासाठी सुरू केलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून त्यासाठी आमची सोबत असेल.
- मानसिंह पवार, उद्योजक, औरंगाबाद.
मदत करण्यास सदैव तयार
कौशल्य विकास, युवक अणि महिलांसाठी "सकाळ माध्यम समूहा'ने सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. आम्ही आमच्या आवाडे उद्योग समूहातर्फे बेरोजगार तरुणांना रोजगार, पात्र तरुणांना बॅंकेमार्फत कर्जपुरवठा, गरज पडल्यास व्यवसाय प्रशिक्षण देऊ शकतो. आतापर्यंत आवाडे उद्योग समूहाने हजारो तरुणांना नोकरी आणि उद्योगासाठी मदत केली आहे. या उपक्रमास नेहमीच आवाडे उद्योग समूह मदत करण्यास तयार आहे.
- श्री स्वप्नील आवाडे, उद्योगपती,
आवाडे उद्योग समूह, इचलकरंजी.