#SakalForMaharashtra "एकत्र येऊया, मार्ग काढुया'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

"सकाळ'च्या "एकत्र येऊया, मार्ग काढुया' उपक्रमाद्वारे एकत्र येऊन समाजातील विविध प्रश्‍नांवर तोडगा काढणे शक्‍य आहे. उद्योगसमूह आणि उद्योजक कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी अनेक उपक्रम राबवीत असतात. "कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्स्बिलिटी फंड' (सीएसआर)च्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता विकासासाठी अनेक उपक्रम, कार्यक्रम राबविले जातात.

विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थांसह उद्योगसमूहांकडून अंशकालीन व्यवसाय प्रशिक्षण शिबिरेही राबविली जातात. रोजगार कमी होत आहेत ही वास्तविकता आहे; परंतु व्यवसायासाठी आवश्‍यक कौशल्य प्राप्त केली पाहिजे. त्यासाठी स्वयंरोजगार हाच पर्याय आहे. विविध उद्योगांमध्ये संधी येत आहेत, यापुढे देखील येत राहतील. नावीन्यपूर्ण संकल्पनांवर असंख्य स्टार्टअप तरुणांनी सुरू केले आहे.

नवसंशोधनातून कमी भांडवलात जास्त महसुली उत्पन्न देणारे व्यवसाय उभारले जात आहेत. त्यामुळे लोकांची गरज लक्षात घेऊन त्यावर आधारित व्यवसाय सुरू करता येईल. त्यामुळे तरुणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे. 

- अनंत सरदेशमुख, महासंचालक, 
मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रिकल्चर 

Web Title: SakalForMaharashtra Comments