औरंगाबाद - ‘‘मराठा क्रांती मोर्चातर्फे मराठा आरक्षणासाठी डेडलाइन देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी पाच वाजेपर्यंत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा,’’ असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी सांगितले.

मराठा क्रांती मोर्चातर्फे सात प्रकारच्या मागण्या मांडल्या आहेत. यात मागासवर्गीय आयोग राज्य सरकारला अहवाल कधी देणार, याची तारीख जाहीर करावी. अहवाल मिळाल्यानंतर अध्यादेश, कायद्यात रूपांतर करण्यासाठी विशेष अधिवेशन, अंमलबजावणी कधीपासून करणार, याबाबत माहिती द्यावी. मेगा भरतीमधील मराठा समाजासाठीच्या ११ हजार २५० जागा त्वरित भरणार काय किंवा स्थगिती देणार काय, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये भरीव तरतूद, बॅंकानिहाय कर्ज प्रकरणांबाबत सक्ती करणार काय, आंदोलकांवरील गुन्हे कधी रद्द करणार आदी सर्वंच प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पत्रकार परिषदेद्वारे जाहीर करावीत, असेही पाटील म्हणाले.