#MarathaKrantiMorcha अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 August 2018

नांदेड - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगर येथील आनंद निलयम या निवासस्थानासमोर मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी दुपारी आंदोलन करून घंटानाद करण्यात आला. या वेळी आमदार अमिता चव्हाण, आमदार डी. पी. सावंत यांच्यासह लोकप्रतिनिधींनी सहभाग नोंदवत आरक्षणाच्या मागणीसाठी आम्हीदेखील आपल्यासोबत आहोत, असे आश्वासन दिले.

मराठा समाजाच्या आरक्षणाकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी खासदार अशोक चव्हाण आणि आमदार अमिता चव्हाण यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून घंटानाद करण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजाच्या खासदारांनी लोकसभेत; तर आमदारांनी विधानसभा आणि विधान परिषदेत मागण्या मांडाव्यात. कोणत्याही परिस्थितीत सरकारला आरक्षण देण्यासाठी भाग पाडावे, मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, पोलिसांनी अटक केलेल्या कार्यकर्त्यांची सुटका करावी, या व इतर मागण्या या वेळी करण्यात आल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation agitation Ashok Chavan Home