
मराठा आरक्षण मागणीसाठी परळी येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा विसावा दिवस असून माजलगाव, गेवराई आणि केजमध्ये ठिय्या आंदोलने सुरू आहेत.
बीड : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जिल्ह्यात महिलाही रस्त्यावर उतरल्या आहेत. सोमवारी (ता. 6) मराठा महिला क्रांती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
मराठा आरक्षण मागणीसाठी परळी येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा विसावा दिवस असून माजलगाव, गेवराई आणि केजमध्ये ठिय्या आंदोलने सुरू आहेत. सोमवारी या मागणीसाठी मराठा महिला क्रांती मोर्चा निघाला.
मल्टिपर्पज मैदानावरून निघालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी हातात भगवे झेंडे घेतलेल्या समाजातील महिलांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.