मराठवाड्यात आता ओला दुष्काळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

पिकांचे पन्नास टक्के नुकसान

मुंबई -  कालच्या पावसामुळे मराठवाड्यात ओल्या दुष्काळाचे वादळ घोंघावत आहे. सोयाबीन, कापूस, कडधान्ये आणि इतर पिकांची अतोनात हानी झाली आहे. पिकांच्या नुकसानाचे हे प्रमाण सुमारे ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. प्रशासनाला नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून मराठवाड्यात सुमारे २५ लाख हेक्टर पीक नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये उद्या राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक होत आहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी दिली.

फुंडकर म्हणाले, की मराठवाड्यात यंदा सुमारे ४९ लाख हेक्टर क्षेत्रावर खरिपाची लागवड झाली आहे. यात सुमारे १५ लाख हेक्टरवर सोयाबीन, सुमारे १४ ते १५ लाख हेक्टरवर कापूस आणि उर्वरित इतर पिकांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांतील तुफानी पावसाने यापैकी सध्या सुमारे ५० टक्के क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे क्षेत्र सुमारे २२ ते २५ लाख हेक्टरपर्यंत असून शकते, असा अंदाज आहे. 

राज्यात ९ लाख हेक्टरवर नुकसान

पुणे - अतिवृष्टीमुळे राज्यातील ९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी खात्याच्या विविध विभागांकडून व्यक्त केला जात आहे. सर्वांत जास्त नुकसान सोयाबीनचे झाले असून, कडधान्याचेदेखील नुकसान झाल्यामुळे यंदा उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. 

मराठवाडा, खानदेश, विदर्भात वर्धा भागात नुकसान जास्त झाले आहे. विदर्भातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २० हजार हेक्टरच्या आसपास कपाशीला तडाखा बसला असावा. तुलनेने सोयबीनपेक्षा कपाशीची हानी कमी आहे. मराठवाड्यात पावसाने केलेली हानी मोठी असली तरी अजून ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी स्थिती दिसत नसल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे. 

नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही भागांत नदीकाठची पिके जमिनीसह वाहून गेली आहेत, तसेच काही ठिकाणी नैसर्गिक पात्र बदलून नद्या-नाल्यांचे पाणी शेतात घुसल्यामुळे उभ्या पिकांची हानी झाली आहे.

Web Title: drought in Marathwada