Atms Does Not Cleaning Every Two Hours Aurangabad News
Atms Does Not Cleaning Every Two Hours Aurangabad News

एटीएम "एनी टाईम’ अस्वच्छच!

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बँकांना काळजी घेण्याच्या सूचना केल्या. यानुसार कर्मचारी मास्क, सॅनिटायझर, हॅंडग्लोव्हज वापरत आहेत. एका वेळी केवळ चारच ग्राहकांना बँकेत प्रवेश दिला जातो. सोशल डिस्टन्सचेही पालन केले जाते. तथापि, दर दोन तासाला एटीएम सॅनिटायझरने स्वच्छ करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. हा नियम मात्र बँकांतर्फे अजिबात पाळला जात नाही.

बुधवारी (ता.१५) सिडकोमधील काही बँकांच्या एटीएमवर ‘सकाळ’ प्रतिनिधींनी भेट देत पाहणी केली. त्यावेळी केवळ बँकेला खेटूनच असलेले एटीएम सॅनिटराईज्ड करण्यात येत असून, इतर एटीएम मात्र वाऱ्यावर सोडल्याचे उघड झाले आहे. ज्या उद्देशाने सरकारने लॉकडाउन केले आहे, त्यालाच बँका आणि ठेकेदार हरताळ फासत आहेत. 
शहरात एकूण ३०० हून अधिक एटीएम आहेत. त्यातील काही एटीएम सुरक्षित आहेत. मात्र, अस्वच्छ एटीएमवरून कोरोना विषाणूचा धोका असण्याची शक्यताही जास्त आहे. 

कुठे काय आढळले? 
-----
स्थळ : सिडको टाऊन सेंटर 
कोटक महिंद्रा बँकेचे एटीएम एकच वेळ सॅनिटायझरने स्वच्छ करण्यात येते. पाहणीदरम्यान छायाचित्र घेत असताना हे बँकेतील कर्मचाऱ्यांनी पाहिले आणि तत्काळ एटीएम सॅनिटायझर करण्यासाठी शिपायाला पाठवले. 

स्थळ : वसंतराव नाईक चौक 
येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम दिवसभरातून एकाच वेळी येथे सॅनिटराइज्ड करण्यात येते. दर दोन तासाला स्वच्छता करण्याचा नियम येथेही पाळत असल्याचे दिसून आले नाही. 

हेही वाचा - स्वतः कोरोनाग्रस्त, तरीही जपला डॉक्टरी धर्म

स्थळ : एसबीआय बँक क्षेत्रीय कार्यालय 
एसबीआयच्या येथील दोन्ही एटीएमची दर दोन तासाला सॅनिटायझरने स्वच्छता करण्यात येते. रिझर्व्ह बॅंकेचा नियम येथे पाळण्यात येतो. पाहणीवेळी सुरक्षारक्षक एटीएम स्वच्छ करत होता. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

स्थळ : सिडको बसस्थानक परिसर 
सारस्वत बँकेचे दोन एटीएम आहेत. त्यात बँक सुरू असताना एटीएम सॅनिटराईज्ड करण्यात येते. त्यानंतर कुठल्याच प्रकारे सॅनिटायझर करण्यात येत नसल्याचे दिसून आले. 

स्थळ : टाऊन सेंटर आयनॉक्सच्या बाजूला 
आयसीआयसीआय बँकेचे दोन एटीएम आहेत; मात्र दिवसभरातून एकाच वेळी येथे सॅनिटराइज करण्यात येते. दोन तासांचा नियम येथे पाळला जात नाही. 

स्थळ : सिडको एन -एक चौक 
आयडीबीआय बँकेच्या एटीएमचे कुठल्याच प्रकारे सॅनिटायझिंग करण्यात येत नाही. तर कॉर्पोरेशन बँकेच्या एटीएमचीही हीच परिस्थिती आहे. एटीएम सॅनिटायझर करण्यात येत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com