कोरोनाकंपाने औरंगाबाद हादरले, एकाच दिवसात २०० पॉझिटीव्ह!

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद - शहरात कोरोनाचा संसर्ग वाढताच असून बुधवारी (ता. २४) एकाच दिवसात २०० कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. यात शहरातील ११२ व ग्रामीण भागातील ८८ जण बाधीत झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे, यात एक ते सतरा वर्षे वयोगटातील सात मुली व सात मुलांचा समावेश आहे. 
शहरासह जिल्ह्यात कोरोना वेगाने फैलावत आहे. जिल्ह्यात आता १ हजार ६०१ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यात ४ हजार ३६ कोरोनाबाधित झाले आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दिलासादायक बाब म्हणजे, आजपर्यंत एकूण २ हजार २१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

औरंगाबाद शहरात आढळलेले रुग्ण (कंसात संख्या)
कुतुबपुरा (१), नागसेन नगर (१), बंजारा कॉलनी (१), सराफा रोड (२), व्हीआयपी रोड, ज्युबली पार्क (१), पडेगाव (१), संभाजी कॉलनी, एन-सहा (१), विद्या रेसिडेन्सी (१), जुना बाजार, नारायण नगर (१), पुंडलिक नगर (२), पद्मपुरा (१), इटखेडा (१), विष्णूनगर (१), सादात नगर (१), उल्का नगरी (१), संत तुकोबानगर, एन-दोन, सिडको (१), न्यू हनुमान नगर (१), लक्ष्मी नगर, गारखेडा (१), जयभीम नगर, टाऊन हॉल (१), हर्ष नगर (७), संजय नगर, बायजीपुरा (४), राज नगर (१), हर्सूल जेल (४), सिद्धेश्वर नगर, जाधववाडी (२), वसंत नगर, जाधववाडी (३), नागेश्वरवाडी (१), एकता नगर, चेतना नगर (१), जाधववाडी (१), क्रांती नगर (१), म्हसोबा नगर (२), पोलिस कॉलनी (१), एन-नऊ हडको (१), एन-अकरा (१), एन-तेरा (१), राज हाईट (१), विनायक नगर, देवळाई (२), विशाल नगर (१), गरम पाणी (३), बुढीलेन (३), गारखेडा (५), हरिचरण नगर, गारखेडा (१), शिवाजीनगर (१), रोजाबाग (२), दिल्ली गेट (६), बेगमपुरा (१), नेहरू नगर (१), जामा मशीद परिसर (१०), मयूर पार्क (१), समता नगर (१), सेव्हन राज हाईटस (२), शिवकृपा अपार्टमेंट (१), चिकलठाणा (३), समर्थ नगर (४), आनंद नगर (२), रेहमानिया कॉलनी (१), आरेफ कॉलनी (१), भोईवाडा (१), जुना बाजार (१), बालाजी नगर (२), न्यू पहाडसिंगपुरा (१), घाटी परिसर (२) या भागातील कोरोनाबाधित आहेत. 

ग्रामीण भागातील रुग्ण (कंसात संख्या) 

साई नगर, बजाज नगर (१), बजाजनगर, वाळूज (२), हिवरा (२), पळशी (१), मांडकी (४), कन्नड (१), पांढरी पिंपळगाव (१), दर्गा रोड, दारुसलाम पैठण (६), पडेगाव, गंगापूर (१), वाळूज, गंगापूर (५), गंगापूर (२), गोदावरी कॉलनी, गंगापूर (१), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (१), जयसिंग नगर, गंगापूर (२), हाफिज नगर, सिल्लोड(२), बिलाल नगर, सिल्लोड (५), इंदिरा नगर, वैजापूर (१), पोलिस कॉलनी, वैजापूर (१) फुले नगर, पंढरपूर (१), दिग्वीजय हाऊसिंग सोसायटी (६), न्यू भाग्योदय हाऊसिंग सोसायटी (२), कंदील हॉटेलसमोर बजाज नगर (४), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (३), बीएसएनएल गोडाऊन बजाज नगर (५), सिडको वाळूज महानगर (२), श्रीराम प्लाझा, सिडको वाळूज महानगर (१), सिडको कार्यालय परिसर (४), वडगाव (२), चिरंजीव सोसायटी, बजाज नगर (२), श्‍वेतशील सोसायटी, बजाज नगर (१), गणपती मंदिर परिसर, बजाज नगर (१), संजीवनी सोसायटी, बजाज नगर (१), द्वारका नगरी, बजाज नगर (२), आनंद सोसायटी, बजाज नगर (१), लोकमान्य चौक, बजाज नगर (२), आकाश सोसायटी, बजाज नगर (१), गाडगेबाबा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), जयभवानी चौक, बजाज नगर (२), दत्तकृपा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (२), बालेगाव, वैजापूर (३) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ७८ स्त्री व १२२ पुरुष आहेत. 

कोरोना मीटर 

बरे झालेले रुग्ण ः २२१७ 
उपचार घेणारे रुग्ण ः १६०१ 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com