37 new Covid-19 cases in Aurangabad district
37 new Covid-19 cases in Aurangabad district

Covid-19 : औरंगाबादला सलग तिसऱ्या दिवशीही दिलासा

औरंगाबाद - जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून आली. गत दोन दिवसांत अनुक्रमे ३२ व ३० रुग्णांनंतर रविवारी (ता.२४) ३७ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या १,२८५ झाली आहे. रविवारी सकाळी आणि सायंकाळी एकूण दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता औरंगाबादेत एकूण ५० बळी कोरोना आणि इतर आजारामुळे गेले असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

औरंगाबादेत कोरोनाचा पहिला रुग्ण १५ मार्चला आढळला. त्यानंतर २६ एप्रिलपर्यंत ५३ रुग्ण होते. २७ एप्रिलला एकाच दिवशी २९ रुग्ण आढळले. त्यानंतर रुग्णवाढीचा वेग कायमच होता. आठ मे रोजी सर्वाधिक शंभर रुग्ण होते. यानंतरच्या सात दिवसांच्या काळात सर्वांत जास्त ३६८ रुग्ण बाधित आढळले. २१ मे रोजी ६२ रुग्ण वाढल्यानंतर २२, २३ व २४ मे रोजी रुग्णसंख्या अनुक्रमे ३२, ३० आणि ३७ एवढी झाली. रुग्ण वाढीचा वेग मंदावत असून, ही दिलासादायक बाब आहे. 

घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार
  
रविवारी आढळलेले रुग्ण (कंसात रुग्णसंख्या) 
न्यायनगर, गारखेडा (२), टाऊन हॉल (१), सईदा कॉलनी, जटवाडा रोड (३), कैलासनगर (४), रामनगर (४), नारळीबाग (१), गौतमनगर, जालना रोड (१), संभाजी कॉलनी, सिडको (१), महेशनगर (१), जुना बाजार (१), एमजीएम परिसर (१), भवानीनगर, जुना मोंढा (१), शकुंतलानगर, शहानूरवाडी (१), औरंगपुरा (२), आशियाद कॉलनी, बीड बायपास रोड (१), वडगाव कोल्हाटी (२), अब्दाशहानगर, सिल्लोड (१), आरेफ कॉलनी (१), कटकटगेट (१), एन-आठ सिडको (१), एन-दोन सिडको (१), समतानगर (१), अन्य (३) व गंगापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यात १७ महिला आणि २० पुरुष रुग्णांचा समावेश आहे.  
 
४९ वा मृत्यू 
रविवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास न्यायनगर, एन-आठ सिडकोतील ६३ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना पूर्वीपासून उच्चरक्तदाबाचा आजार होता. 
  
५० वा मृत्यू 
५१ वर्षीय टाऊन हॉल येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाचा दुपारी चार वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना तीन आठवड्यांपासून दम लागत होता. तसेच मधुमेहाचाही त्यांना त्रास होता. घाटीमध्ये आतापर्यंत ४५ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयात एक आणि खासगी रुग्णालयात चार असे एकूण पाच कोरोनाबाधितांचाही मृत्यू झाल्याने जिल्ह्यात आतापर्यंत ५० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. 
  
आतापर्यंत ६१९ रुग्ण झाले बरे 
जिल्हा रुग्णालयातून रविवारी २७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) सिल्कमिल कॉलनीतील दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत जिल्ह्यातील ६१९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत; तर घाटीमध्ये ७९ कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. यामध्ये दहा जणांची प्रकृती गंभीर, ६९ जणांची प्रकृती सामान्य आहे. एकूण ६१६ रुग्ण उपचार घेत आहेत. 
 
कोरोनामीटर 

  • बरे झालेले रुग्ण - ६१९ 
  • उपचार घेणारे रुग्ण - ६१६ 
  • एकूण मृत्यू - ५० 

 
जिल्ह्यातील एकूण रुग्ण - १,२८५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com