
अब्दुल सत्तार समर्थकांनी सोशल मीडियावरून #AbdulSattarForCM असा ट्रेंड चालवला आहे. विशेष म्हणजे त्यात...
"ज्यांचं लक्ष मुख्यमंत्री पद असतं, त्यांना राज्यमंत्री पदाचं कौतुक नसतं'
असंही ठळकपणे ठसवलं आहे.
औरंगाबाद : राजकारणात आलेल्या प्रत्येक आमदाराला मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा असतेच. काहींचे तसे आडाखेही सुरू होतात. काही जण मंत्रीपदावर समाधान मानतात, तर काही "स्वाभिमानी' लोक "राज्यमंत्री'पद लाथाडून मुख्यमंत्री होण्याचीच मोर्चे बांधणी करतात.
सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचे जिल्हा परिषद निवडणुकीतील "नाराजीनामानाट्य' संपल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावरून #AbdulSattarForCM असा ट्रेंड चालवला आहे. विशेष म्हणजे त्यात...
"ज्यांचं लक्ष मुख्यमंत्री पद असतं,
त्यांना राज्यमंत्री पदाचं कौतुक नसतं'
असंही ठळकपणे ठसवलं आहे.
नगरसेवक पदापासून कारकीर्दीला सुरवात केलेल्या अब्दुल सत्तार यांना कोणताही राजकीय वारसा नाही. मात्र, एका विशिष्ट पद्धतीने केलेल्या राजकारणाने विधानपरिषद निवडणुकीतून विधिमंडळ गाठले. सुरवातीला किसनराव काळे, पालोदकर परिवार, काळे परिवाराशी खुबीने जवळीक साधत, प्रसंगी राजकारण करत त्यांना गारद केले.
विधानसभा निवडणुकीत थोडक्या मतांच्या फरकाने पराभव स्वीकारल्यानंतर त्यांनी सिल्लोड-सोयगाव तालुक्यात पहिल्या दिवसापासून सुरू केलेले काम, त्यासाठी सुरवातीला शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील आणि नंतर बाळासाहेब थोरात अशा सर्व नेत्यांशी जवळीक साधली.
त्याच वेळेस शेजारच्या मतदार संघातील खासदार रावसाहेब दानवे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे सत्तारांशी असलेले सख्यही सर्वश्रुत आहे. प्रत्येक वेळी काही ना काही वादांत सापडल्याने ते कायम चर्चेत राहिले.
वाचा कोण म्हणतेय - अब्दुल सत्तार गद्दार, मातोश्रीवर घेऊ नका
आता सलग तिसऱ्यांदा आमदार झालेले सत्तार यांचा कॉंग्रेसला रामराम ठोकून, भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करत शिवसेनेत पडलेला मुक्काम नुकताच सर्वांनी पाहिला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या बंडखोरी आणि राजीनामा नाट्यानंतर ते पुढे काय डाव टाकतात, याकडे लक्ष लागले आहे.
...आणि ट्रोलधाड पडली
समर्थकांनी अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केली खरी, पण तशा पोस्ट्स टाकताच त्यांच्यावर ट्रोलधाड पडली. दोन्ही बाजूंच्या नेटकऱ्यांनी आपापली मते व्यक्त करत एकमेकांचा खरपूस समाचार घेतला. काहींनी तर "सत्तार यांना मुख्यमंत्रीच काय, थेट अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षच करा,' अशी उपहासात्मक टीकाही केली आहे.
वाचा - संजय राऊत काय म्हणाले?
हहहह