..तरिही अब्दुल सत्तार यांच्याकडे महसूल, ग्रामविकास 

..तरिही अब्दुल सत्तार यांच्याकडे महसूल, ग्रामविकास 

औरंगाबाद : अब्दुल सत्तार यांच्या राजीनामानाट्याने सरकारची झालेली फजिती, औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेने उपाध्यक्षपद गमावल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्याकडे कोणती खाती जातात याकडे सर्वांचे लक्ष होते.

अधिकृतपणे खाते वाटप जाहिर झाल्यानंतर सत्तार यांना महसुल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य ही खाती मिळाली. विशेष म्हणजे त्यांना महसुल तसेच ज्या परिषद अध्यक्षपदासाठी त्यांनी एवढा राडा केला त्या जिल्हा परिषदेशी निगडीत ग्रामविकास हे वजनदार खाते मिळाले आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेतील अध्यक्षपद तसेच कॅबिनेट मंत्रीपद मिळावे यासाठी सत्तार यांनी राजीनामास्त्र उपसल्याची शनिवारी (ता.4) दिवसभर चर्चा होती. मात्र माझा राजीनामाच्या पुडी कुणी सोडली ? असा उलट सवाल करुन सत्तार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यांची नाराजीदुर करण्यासाठी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना तीनवेळ सत्तार यांची भेट घेऊन मनधरणी करावी लागली होती.

खोतकर यांनी सत्तार हे नाराज नसल्याचे सांगितले होते मात्र त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानात सत्तार समर्थक सहा कॉंग्रेसच्या सदस्यांनी थेट भाजपच्या उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समसमान 30 मते पडली.

चिठ्ठीद्वारे महाविकास आघाडीच्या मिना शेळके यांचे नशीब उजळले मात्र सत्तार यांच्या नाराजीने शिवसेनेला उपाध्यक्षपद गमावावे लागले. येथे भाजपचे एल. जी. गायकवाड विजयी झाले. दिवसभरच्या घटनाक्रमानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा सत्तार हे गद्दार असून त्यांना मातोश्रीची पायरी चढू देऊ नका अशी भूमिका मांडली होती.

या सर्व घटनाक्रमानंतर सत्तार यांना कोणती खाते मिळेल याकडे सर्वांचे लक्ष होते. इतक्‍या घटना घडून सुद्धा सत्तार यांच्या वाट्याला महसूल, ग्रामविकास सारख्या अतिशय महत्वाची खात्याची जबाबदारी मिळाली आहे. ज्या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सत्तार यांची नाराजी समोर आली होती ते ग्रामविकास खाते सुद्धा सत्तार यांच्याकडे आहे. 

स्थानिक नेते सत्तारांवर संतापले 

अब्दुल सत्तार यांच्या राजीनामानाट्यानंतर पक्षाची झालेली फजिती आणि जिल्हा परिषदेतील उपाध्यक्षपद गमावावे लागल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील नेते अब्दुल सत्तार यांच्यावर चांगलेच संतापले आहे.

चंद्रकांत खैरे यांनी तर उघडपणे सत्तार हे गद्दार असून त्यांना पवित्र मातोश्रीची पायरी चढू देऊ नका अशी आपली प्रतिक्रीया दिली. शिवाय जिल्ह्यातील सर्वच आमदार, कार्यकर्ते सुद्धा सत्तार यांच्यावर नाराज आहे. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर ही नाराजी स्पष्टपणे दिसून आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com