esakal | ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात अकरा हजारांवर उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात प्रचाराला येणार वेग
sakal

बोलून बातमी शोधा

sarpanch

औरंगाबाद जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतीसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या रिंगणात ११ हजार ४९९ उमेदवार नशीब अजमावत आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात अकरा हजारांवर उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात प्रचाराला येणार वेग

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतीसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या रिंगणात ११ हजार ४९९ उमेदवार नशीब अजमावत आहेत. जिल्ह्यातील नऊ तालूक्यातील ६१७ ग्रामपंचायतींमध्ये सदस्य निवडीसाठी ११ हजार ४९९ उमेदवार मैदानात आहेत. ६१७ ग्रामपंचायतींच्या २ हजार ९० प्रभागातुन ग्रामपंचायत सदस्य निवडण्यासाठी २३ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र भरणे सुरू झाले होते.

पती हर्षवर्धनविरोधात संजना जाधव निवडणुकीच्या रणांगणात, मुलाचे आईविरुद्ध पॅनल

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३० डिसेंबरपर्यंत १७ हजार ३३३ जणांनी अर्ज भरले होते. त्यात छाननीमध्ये ३६८ नामनिर्देशनपत्र बाद झाले तर १६ हजार ९६५ नामनिर्देशनपत्र वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्याभरातुन ४ हजार ६८० जणांनी माघार घेतली. त्यामुळे ११ हजार ४९९ उमेदवार आता निवडणुकीच्या मैदानात राहिले आहेत. यापैकी ५ हजार ६८३ ग्रामपंचायत सदस्य निवडण्यासाठी २ हजार २६१ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.

तालूकानिहाय उमेदवार व मतदान केंद्र
.....................
तालुका................उमेदवार...............मतदान केंद्र
....................
० वैजापुर...............१६३०...........................३१५
० सिल्लोड..............१५०९...........................३३६
० कन्नड .................१५१२........................३१२
० पैठण..................१७३२..........................३२१
० औरंगाबाद...........१४४५.........................३१६
० गंगापुर.................१४४८...........................२८७
० फुलंब्री..................१०११.......................१७१.
० सोयगाव................७३८.........................११४
० खुलताबाद............४७४...........................८९

Edited - Ganesh Pitekar