दहावा आटोपलेले, लग्नाला चाललेले : दोन भीषण अपघातात ३१ जखमी 

Aurangabad news
Aurangabad news

सिल्लोड (औरंगाबाद) : सिल्लोड तालुक्यात गुरुवारी (ता.२७) दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये ३१ प्रवासी जखमी झाले. घाटनांद्रा घाटात जीप, उंडणगावजवळ पिकअप वाहन उलटले. त्यातील बारा प्रवाशांना प्रथमोपचारानंतर औरंगाबादला हलविण्यात आले असून, उर्वरित १९ प्रवाशांवर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घाटनांद्रा (ता. सिल्लोड) येथून दहाव्याचा कार्यक्रम आटोपून पाचोऱ्याकडे जाणाऱ्या क्रुझर जीपचे (एमएच-२८, सी-४७१०) घाटनांद्रा घाटातील तिडका गावाजवळ टायर फुटून वाहन चार ते पाच वेळा उलटले.

दुसऱ्या घटनेत, उंडणगाव (ता. सिल्लोड) येथून खुल्लोडला विवाह समारंभासाठी जात असलेल्या पिकअप वाहनाचेही (एमएच-२०, ईएल-३१८७) टायर फुटल्यामुळे ते रस्त्याच्या कडेला उलटले. दोन्ही अपघातांमध्ये ३१ प्रवासी जखमी झाले.

सर्व अपघातग्रस्तांना तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. यातील बारा जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटीमध्ये पाठविण्यात आले.

घाटी रुग्णालयात दाखल जखमी... 

  • कौसाबाई तानाजी नरवडे (५५, रा. उंडणगाव)
  • संगीता देविदास मळेकर (३५, रा. वालसावंगी)
  • रुख्माबाई माधव सपकाळ (५०, रा. धावडा)
  • मनाबाई विष्णू लांडगे (६२, रा. उंडणगाव)
  • ओम मारुती सपकाळ (४, रा. धावडा)
  • तुळसाबाई आनंद घोरपडे (५०, रा. सावखेडा)
  • संगीता अनिल पैठणकर (३०, रा. अन्वा)
  • ज्योती गणेश खेडकर (३२, रा. औरंगाबाद)
  • अनिता शिवाजी साळुंखे (३२, रा. औरंगाबाद)
  • साक्षी अशोक सोनवणे (१४, रा. साखळी, ता. चिखली)
  • श्‍यामराव रमाजी धनवई (६०, रा. रामपूरवाडी)
  • ताराबाई धनराज गवांडे (६०, रा. वाडीशेवाळा)

सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत

  • पुष्पा पांडुरंग धनवई (३५, रा. पिशोर) 
  • उषाबाई ज्ञानेश्वर शेळके (४०, रा. पाचोरा)
  • समर्थ गणेश खेडकर (अडीच, रा. नेवपूर)
  • नीलेश प्रभाकर लांडगे (१२, रा. उंडणगाव)
  • शुभम दिलीप तगडे (१३, रा. धावडा)
  • महादू बंडू सपकाळ (७५, रा. धावडा)
  • राधा गजानन सपकाळ (२१, रा. शिवना)
  • रत्ना अरुण मोकासे (२५, रा. पिशोर)
  • गौरी शेषराव नरवडे (८, रा. उंडणगाव)
  • लक्ष्मण नानजी भातवे (४०, रा. उंडणगाव) 
  • सुखदेव रामभाऊ सनान्से (५५, रा. साखळी, ता. चिखली)
  • रामेश्वर माणिक गिरे (३०, रा. औरंगाबाद)
  • ऋषिकेश कृष्णा खडके, (१५, रा. पिशोर)
  • करण रामेश्वर गिरे (९, रा. औरंगाबाद)
  • अनिकेत कृष्णा खडके (१४, रा. पिशोर)
  • चेतन प्रकाश वाघ (१२, रा. मासोळ)
  • सोनाबाई रामभाऊ सनान्से (७५, रा. साखळी)
  • हेमंत अनिल पैठणकर (८, रा. अन्वा)
  • आदित्य अरुण मोकासे (१४, रा. पिशोर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com