जिपडीची चाकं मोडली, दुचाकीचा चुरा झाला आणि...

Aurangabad news
Aurangabad news

आळंद (फुलंब्री) : प्रवाशी वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील काळी पिवळी चालकाने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी स्वारास उडविल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील आळंद येथील गणपती फाट्या जवळ गुरुवारी (ता. 27) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.

माजिद बाबू बेग (वय 26 वर्षे, रा.वडोद बाजार, ता.फुलंब्री) असे जखमी दुचाकी चालकाचे नाव असून, प्राप्त माहितीनुसार, प्रवाशी वाहतूक करणारी काळीपिवळी (क्रमांक.एम्.एच.20. बी टी 9557) सिल्लोडकडे जात होती, तर माजिद बेग हे दुचाकीने (क्रमांक एम्.एच.20 बी आर 6176) हे सिल्लोडहुन वडोद बाजार कड़े जात होते.

भरधाव वेगातील काळीपिवळी चालकाने दुचाकी चालकास विरुद्ध दिशेने जाऊन जोराची धड़क दिली. यात माजिद हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या पायाला मार लागला. अपघात इतका भयानक होता की, दुचाकीचा पूर्ण पणे चुराडा झाला. तर काळीपिवळीची समोरील दोन्ही चाके निखळून पडली.

गंभीर जखमी माजिद यास उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल केले असून, अपघाताची माहिती मिळताच वडोद बाजार पोलिसांनी घटना स्थळी धाव घेवून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com