कारला चिरडत पुढे जात राहिला कंटेनर, तीन मृतदेह कसेबसे काढले बाहेर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 जानेवारी 2020

अपघात एवढा भीषण होता, की मारुती झेन या वाहनाचा पूर्णपणे चकणाचूर झाला. कंटेनरने कारला तब्बल शंभर फूट फरफटत नेले.

जायकवाडी (पैठण) : पैठण- औरंगाबाद या मुख्य रस्त्यावरील ईसारवाडी गावाजवळ कंटेनर व मारूती झेनची समोरा-समोर धडक झाली. या अपघातात तीन जण जागेवरच ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता.९) पहाटे चारच्या सुमारास घडली. मृतांमध्ये पती-पत्नी व सासू यांचा समावेश आहे.

या बाबत एमआयडीसी पैठण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पैठण-औरंगाबाद या मुख्य रस्त्यावरील ईसारवाडी गावाजवळ औरंगाबाद येथून मशिनरी घेऊन जाणारे कंटेनर (क्र जी.जे.०६. ए.झेड. ६८५१) आणि पैठणकडून औरंगाबादकडे जात असलेली मारूती झेन कार (क्रमांक एम एच १२ सी.के. ३४६८) यांची समोरासमोर जोराची धडक झाली. 

यामध्ये मारूती झेन वाहनचालक बाळासाहेब निवृत्ती डाके ( वय ४५ वर्षे), त्यांची पत्नी अंबिका बाळासाहेब डाके (वय ४० वर्षे, दोघे रा. ढोरजळगाव, ता.शेवगाव), तसेच त्यांच्या सोबत असलेल्या सासू सुमन रघुनाथ नरवडे (वय ६५ वर्षे, रा. वरुडबुद्रुक, ता.शेवगाव) हे तिघे जागीच ठार झाले. 

वाहनाचा पूर्णपणे चकणाचूर

अपघात एवढा भीषण होता, की मारुती झेन या वाहनाचा पूर्णपणे चकणाचूर झाला. कंटेनरने कारला तब्बल शंभर फूट फरफटत नेले. अपघात स्थळावरून कंटेनर चालक घटनास्थळावरुन पळून गेला. या अपघाताची माहिती ईसारवाडी येथील ग्रामस्थांनी पैठण एमआयडीसी  पोलिस ठाण्याला दिली. 

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारमध्ये जागीच ठार झालेल्या मृतांना ग्रामस्थांच्या मदतीने  बाहेर काढून पैठण येथील शासकीय रुगण्लयात दाखल केले असून शवविच्छेदन करण्यात येत आहे.

हेही वाचा - 

दहा महिन्यांच्या बाळांसह ती झाली बेपत्ता, सापडल्यानंतर पतीला म्हणाली...

धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

मोबाइलमध्ये इंटरनेट वापरताय? गूगलच्या या सेटिंग्ज माहिती हव्याच! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accident on Paithan Aurangabad Road Jayakwadi News