मका पिकावर आली लष्करी अळी, सावध व्हा, असे करा व्यवस्थापन

spodoptera-frugiperda-worm
spodoptera-frugiperda-worm

औरंगाबाद: मराठवाड्यात मागील दोन वर्षांपासून अमेरिकन लष्करी अळीने चांगलेच जेरीस आणले होते. यामध्ये मकाचे ५० ते ७० टक्क्यांवर नुकसानही झाले. याशिवाय लष्करी अळीचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊन आजवरच्या इतिहासात कधी नव्हते ते प्रथमच बाजरी पिकावर फवारणी करण्याची वेळ आली होती.

यंदाही नुकतीच मका पिकाची पेरणी झाली असून सध्या हे पिक अवघ्या गुडघाभर वाढले आहे तर काही ठिकाणी वीतभर वाढलेले आहे, अशाही अवस्थेत मकावर लष्करी अळीचा प्रादूर्भाव झाल्याचे चित्र असून आतापासूनच योग्य त्या मात्रेनुसार फवारणी करण्याचे आवाहन औरंगाबादेतील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सु. बा. पवार यांनी केले आहे.

असा आहे नुकसानीचा प्रकार

डॉ. पवार यांच्या मका पिकाची लागवड केल्यानंतर १० ते १५ दिवसांनी निरीक्षण करावे. त्यामध्ये साधारण किडीची अळी अवस्था पिकांना नुकसान पोहोचते सुरुवातीच्या अवस्थेत अळ्या पानाचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे चट्टे दिसतात. मोठ्या आळी या पाने कुरतडुन खातात. त्यामुळे पानांची छिद्रे दिसतात. अळी फुग्यांमध्ये शिरून आत खाते. पानांची छिद्रे व पोंग्यमध्ये अळीची विष्ठा ही चिन्हे या अळीच्या प्रादुर्भावाची लक्षणे आहेत. या किडींच्या प्रादुर्भावामुळे ३० ते ६० टक्के पर्यंत उत्पन्नात घट होऊ शकते.

तीन दिवसात जन्मतात २ हजारावर अळ्या

मादी पतंग पानावर पुंजुक्यामध्ये अंडी घालते. एका पुंजक्यामध्ये १०० ते २०० अंडी असतात. एक मादी १५००-२००० अंडी घालते. अंड्यातून दोन ते तीन दिवसात अळ्या बाहेर निघतात. अळ्यांची वाढ १४ ते ३० दिवसांत पूर्ण होते व जमिनीमध्ये कोषावस्थेत मध्ये जातील कोषावस्था आठ ते तीस असते पतंग दहा दिवस जगतात.

असे करा व्यवस्थापन

- वेळेवर कोळपणी व खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे.
- अंडीपुंज समूहातील लहान व मोठ्या लष्करी अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
- सामूहिकरित्या मोठ्या प्रमाणात पतंग आकर्षित करण्यासाठी कामगंध सापळे १५ (प्रती एकरी) लावावेत.
- उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा, टीले नोमस ५० हजार अंडी (प्रति एकर) याप्रमाणे एका आठवड्याच्या अंतराने तीन वेळा पानाच्या खालच्या बाजूस लावावेत.

हेही वाचा: व्याज कापल्याशिवाय बॅंका देईनात पीककर्ज, खरीपात कशी करु पेरणी म्हणत शेतकरी थेट खंडपीठात  

ही कीटकनाशके फवारा
५ टक्के प्रादूर्भाव झाल्यास अझाडिरॅक्टीन१५०० पीपीएम ५० मिली किंवा जैविक कीटकनाशक मेटारायझियम अनसिपोली किंवा निमोरिया रिलाई ५०मिली (ग्रॅम) प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ४ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे. १० टक्के पेक्षा जास्त प्रादूर्भाव झाल्यास थायमिथिक्झाम १२.६ टक्के + लॅमडा साहॅलोथ्रीन ९.५ टक्के झेड सी ०५ मिली फवारावे असेही डॉ. पवार म्हणाले.

कीटकनाशके फवारण्याची जी मात्रा दिलेली आहे, ती केवळ साध्या पंपासाठी असून याव्यतिरिक्त पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीनपट वापरावे. लष्करी अळीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आताच सावध होऊन यावर नियंत्रण मिळवावे. तर आपल्या हाती शाश्‍वत येईल.
- डॉ. सु. बा. पवार, शास्त्रज्ञ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com