Good news! औरंगाबादमधील २३ वसाहती झाल्या कोरोनामुक्त

All patients cured, 23 colony Covid-free in Aurangabad
All patients cured, 23 colony Covid-free in Aurangabad

औरंगाबाद  : एकीकडे नवनवीन भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असले तरी दुसरीकडे नागरिकांच्या आशा पल्लवित करणारी माहिती महापालिकेने जाहीर केली. शहरातील तब्बल २३ वसाहती मंगळवारी (ता.२६) कोरोनामुक्त झाल्या आहेत. या वसाहतींमधील रुग्ण ठणठणीत होऊन घरी गेल्यामुळे हे कंटेन्मेंट झोन आता संपुष्टात आले आहेत. 

शहरातील तब्बल १६० वसाहतींना कोरोनाचा विळखा पडला होता. दरम्यान नवनवीन भागात कोरोना रुग्ण आढळून येत असल्यामुळे शहराचे टेन्शन कायम आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत आहे, तर ज्या भागात जास्त संख्येने रुग्ण आढळून येत होते त्या भागातील संख्याही कमी झाली आहे, तर काही वसाहती आता कोरोनामुक्त झाल्या आहेत. कोरोना रुग्ण आढळल्यानंतर महापालिका व पोलिसांतर्फे त्या भागात रुग्णाच्या घराभोवतीचा शंभर मीटरचा परिसर कंटेन्मेट झोन म्हणून घोषित केला जातो. तिथे ये-जा करण्यास मनाई केली जाते. लोकांची पुढील चौदा दिवस नियमितपणे आरोग्य तपासणी केली जाते. सलग चौदा दिवसांत नवीन रुग्ण आढळून आला नाही तर हा कंटेन्मेंट झोन संपुष्टात येतो. त्यानुसार मंगळवारी शहरातील २३ कंटेन्मेंट झोन संपुष्टात आले असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. 

घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार
  
या भागांचा आहे समावेश 
सिडको एन-१, सिडको एन-४, आरेफ कॉलनी, सह्याद्रीनगर सातारा, श्रीनिवास कॉलनी देवळाई, कासलीवाल तारांगण मिटमिटा, पदमपुरा, अहबाब कॉलनी, यादवनगर एन-११, बायजीपुरा लेन-२१, गुरुदत्तनगर, चेलीपुरा, एमआयडीसी चिकलठाणा, शहानगर मसनतपूर, चांदमिरी, विजयश्री कॉलनी एन- पाच, निजामिया कॉलनी रोशन गेट, खडकेश्वर सांस्कृतिक मंडळ, गौतम बुद्धनगर जवाहर कॉलनी, सावित्रीनगर चिकलठाणा, देवळाई, सिडको एन-११, हक टॉवर आदी. 

तिघांना घाटीतून सुटी  
तीन पॉझिटिव्ह रुग्णांना आयसीएमआरच्या नियमावलीप्रमाणे सुटी देण्यात आली. ब्राह्मण गल्ली बेगमपुरा येथील ३६ वर्षीय पुरुष, गणेशनगर, सातारा परिसर येथील ५० वर्षीय पुरुष, मकसूद कॉलनी, चंपाचौक येथील ६५ वर्षीय महिलेचा सुटी दिलेल्यात समावेश आहे. 
 

२४ तासांतील स्थिती
 

घाटी रुग्णालय - 

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चोवीस तासांत ६० जणांची तपासणी 
  • त्यापैकी ३८ रुग्णांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. 
  • चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह, तिघांचा अहवाल निगेटिव्ह, ३१ रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा. 
  • जिल्हा रुग्णालयातून तीन पॉझिटिव्ह रुग्णांना घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com