औरंगाबादकर तरुणाने आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर फडकवला तिरंगा, खडतर वातावरणातही सर केले शिखर 

ई सकाळ टीम
Thursday, 28 January 2021

अंबादास हा १९ जानेवारी रोजी शिखर मोहिमेसाठी रवाना झाला होता. प्रजासत्ताक दिनी सकाळी सव्वा अकरा वाजता किलीमांजरो शिखर सर करुन भारतीय तिरंगा फडकावला आहे.

औरंगाबाद : आफ्रिकेतील सर्वांत उंच शिखर असलेल्या किलीमांजरो औरंगाबादच्या तरुणाने प्रजासत्ताक दिनी (ता.२६) सर करुन तिरंगा फडकविला आहे. या तरुणाचे नाव आहे अंबादास गायकवाड. त्याचे स्वप्न वास्तवात आले आहे. थंड वारे, खडतर चढउतार अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने किलीमांजरो शिखर सर केला आहे.

नवऱ्यावर रागावून जीव द्यायला गेली, पण एकमेकांना पाहताच ढसढसा रडले!!! 

अंबादास हा १९ जानेवारी रोजी शिखर मोहिमेसाठी रवाना झाला होता. प्रजासत्ताक दिनी सकाळी सव्वा अकरा वाजता किलीमांजरो शिखर सर करुन भारतीय तिरंगा फडकावला आहे. जबरदस्त कामगिरीमुळे भारतीय घटनेतील स्वातंत्र्य, समता, बुंधता, एकात्मता या तत्त्वांचा प्रचार जगभर होणार आहे, असे अंबादास यांचे प्रशिक्षक एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांनी सांगितले. 

न थांबता सलग चोवीस तास सादर केली मराठमोळी लावणी, लातूरच्या कन्येने रचला इतिहास

टांझानियातील शिखर
आफ्रिका खंडातील टांझानिया देशात किलीमांजरो शिखर आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून १९ हजार ३४१ फूट आहे. शिखर मोहिमेसाठी अंबादार गायकवाड याने अनेक वर्ष सराव केला. यापूर्वी लेहमधील कांगरी शिखर मोहिमही सर केला आहे. त्याने शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले आहे. येत्या काळात अंबादास युरोप आणि आॅस्ट्रेलिया खंडातील शिखर सर करण्याची इच्छा आहे. तो ३६० एक्सस्प्लोअर ग्रुपद्वारे आयोजित या किलीमांजरो शिखर मोहिमेत सहभागी झाला होता. 

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

दुसरा गिर्यारोहक
अंबादास गायकवाड हा औरंगाबाद येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (एमआयडीसी) नोकरीला आहेत. गिर्यारोहणाचा त्याने लहानपणापासून आवड आहे. किलीमांजरो शिखर मोहिम सर करणारा एमआयडीसीचा पहिला कर्मचारी आहे. यापूर्वी मनीषा वाघमारे यांनी किलोमांजरो शिखर चढाई केली आहे.  

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambadas Gaikwad Climb Africa's Highest Mountain Aurangabad News