esakal | Animal Discovery Report : महाराष्ट्रात सापडल्या प्राण्यांच्या 21 नवीन प्रजाती 
sakal

बोलून बातमी शोधा

beduk-khekda.jpg

अॅनिमल डिस्कव्हरी-२०१९ अहवालानूसार महाराष्ट्रात 21  नवीन प्राण्यांच्या प्रजाती आढऴून आल्या आहेत. तर देशभरात 480 प्राण्यांचा समावेश आहे. 

Animal Discovery Report : महाराष्ट्रात सापडल्या प्राण्यांच्या 21 नवीन प्रजाती 

sakal_logo
By
प्रताप अवचार

औरंगाबाद : भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेकडून नुकताच अॅनिमल डिस्कव्हरी 2019 हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात सन 2019 या वर्षभरात प्राण्यांच्या 480 प्रजाती आढऴून आल्या असून त्यात 360 प्राण्यांच्या प्रजाती नवीन आहेत. विशेष म्हणजे या अहवालात नोंद झाल्याप्रमाणे महाराष्ट्रात 21 नवीन प्रजाती आढऴल्या आहेत.   

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

देशात मागील वर्षात -२०१९ मध्ये प्राण्यांच्या 480 प्रजाती आढळल्या आहेत. पैकी ३६० नवीन प्रजाती असून ११६ प्रजाती पहिल्यांदाच भारतात आढळल्या आहेत. भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेकडून प्रसिद्ध होणारा अॅनिमल डिस्कव्हरी २०१९ या अहवालात तशी नोंद झाली आहे. अहवालानुसार महाराष्ट्रात २१ नवीन प्रजाती आढळल्या आहेत. पैकी तीन प्रजातींचे (तुडतुडे कुळातील जनावरांवर आढळणारे परपोशी किटक) संकलन हे औरंगाबाद जिल्ह्यातून करण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भारतीय प्राणी सर्वेक्षण अर्थात झेडएसआय ही संस्था देशातील प्राण्यांच्या नोंदी घेण्याचे काम करीत असते. दरवर्षी देशभरात नव्याने आढळणाऱ्या प्राण्यांची यादी ही संस्था नोंद करुन त्याचा अहवाल प्रसिद्ध करीत असते. 2019 या वर्षाचा अहवाल झेडएसआयने काही दिवसांपुर्वीच प्रसिद्ध केला आहे. या अहवालात मागील वर्षात देशभरात 480 नवीन प्राणी आढळल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी 116 प्रजाती या देशात पहिल्यांदाच आढळल्या आहेत. विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील २१ प्राण्यांचा समावेश आहे. यात सरपटणारे (सरडा, पाल), उभयचर (बेडूक, खेकडा), कीटक, जलचर (मासे) प्राण्यांचा समावेश आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील या जिल्ह्यात आढऴल्या प्राण्यांच्या प्रजाती 
मुंबई, पुणे, नाशिक, चंद्रपूर, अहमदनगर, रत्नागिरी, ठाणे, भंडारा, नाशिक, अकोला, कोल्हापूर, सातारा, अमरावती, अलिबाग या जिल्ह्यांत नवीन प्राण्यांच्या प्रजाती आढऴल्या आहेत.