esakal | पाचोरा ते जामनेर रेल्वे मार्गाचं होणार रुंदीकरण; तालुक्यातील प्रवाशांना दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

railway

पाचोरा आणि जामनेर या दोन तालुक्यांना जोडणारा पी.जे रेल्वे मार्ग आता रुंदीकरण करण्यात येणार आहे.

पाचोरा ते जामनेर रेल्वे मार्गाचं होणार रुंदीकरण; तालुक्यातील प्रवाशांना दिलासा

sakal_logo
By
यादव कुमार शिंदे

सोयगाव (औरंगाबाद) : तालुक्याला लागूनच असलेल्या जळगाव जिल्ह्यातून धावणाऱ्या पी.जे रेल्वे मार्गाचा रुंदीकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेवून याबाबत नवीन अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. या निर्णयामुळे सोयगाव तालुक्याला दिलासा मिळाला आहे.

सोयगाव परिसरातून फास्ट मुंबईला जाण्यासाठी आधार ठरलेली पाचोरा ते जामनेर रेल्वे मार्गाचे आता रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नवीन अर्थसंकल्पात या रुंदीकरणाची तरतूद करण्यात आली आहे.त्यामुळे आता पाचोरा-जामनेर पी.जे रेल्वे अधिक जोरात होणार असल्याने सोयगावकरांचा मुंबई प्रवास अधिक फास्ट होणार आहे. पाचोरा आणि जामनेर या दोन तालुक्यांना जोडणारा पी.जे रेल्वे मार्ग आता रुंदीकरण करण्यात येणार आहे.

सहायक पोलिस निरीक्षक ताईतवाले यांच्यावर औरंगाबादेत जीवघेणा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरु

पाचोरा-जामनेर ही पी.जे रेल्वे सोयगाव तालुक्याच्या सीमारेषेवरून धावते त्यामुळे या पी.जे रेल्वेचा सोयगाव परिसरातील जरंडी,माळेगाव,पिंपरी आणि कंकराळा,निंबायती या परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होतो,सोयगाव शिवाराच्या हाकेच्या अंतरावर या पी,जे रेल्वेचे स्थानके आहे.त्यामुळे हा मार्ग जणूकाही सोयगाव तालुक्यातूनच धावतो अशी भावना आहे,जुन्या काळापासून सोयगाव परिसरातील ग्रामीण भागातील पाचोरा आणि जामनेर जाण्यासाठी या पी.जे रेल्वेचा उपयोग घेतात त्यामुळे हि पी,जे रेल्वे सोयगावकरांसाठी पर्वणी ठरली आहे.मीटरगेज मार्ग असलेल्या या पी.जे रेल्वेच्या मार्गाचे ब्रॉडगेज मार्गात रुपांतर होणार असून डिसेंबर २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पाचोरा रेल्वे प्रशासनाने दिली आहे.त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह सोयगाव तालुक्यात या अर्थसंकल्पात स्थान मिळाले आहे.

कोठेही जा भाडे फक्त दहा रुपये-

या पी,जे रेल्वेच्या कोणत्याही स्थानकावरून कुठेही प्रवास करा भाडे फक्त दहाच रु आहे.त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारा हा पी,जे रेल्वेचा प्रवास आहे.

शेतीसाठी मजुरांचा झुकझुक गाडीने प्रवास-

सोयगाव परिसरातील सहा गावांचे शेती स्गीवर या पी,जे मार्गाच्या लागुनच आहे.त्यामुळे मजुरांना शेरतात कामाला जाण्यासाठी चक्क जुन्या काळापासून रेल्वेचा प्रवास भाग्यात आहे,या झुकझुक गाडीने मजूर वर्ग मोठ्या प्रमाणावर पहाटे आणि सायंकाळी घरी परत येण्यासाठी या पी,जे रेल्वेने प्रवास करतात त्यामुळे सोयगाव परिसरातील शेतमजुरांना शेतात जाण्यासाठी रेल्वेचा प्रवास नशिबात आहे.

गुन्हेगारांसोबतचा गृहमंत्री अनिल देशमुखांचा फोटो व्हायरल, विरोधकांनी केली टीका

-दुपारची न्याहारी करण्याची शिटी-

पाचोरा ते जामनेर प्रवास करतांना हि पी.जे रेल्वे सोयगाव तालुक्यातील माळेगाव,पिंपरी,कंकराळा आदी शिवारातून जात असल्याने दुपारी जामनेर वरून परत येतानन मजुरांना दुपारची न्याहारी करण्याची शिटी वाजवीत मार्गस्थ होत असते त्यामुळे या रेल्वेची शिटी वाजताच मजूर दुपारची न्याहारी करतात.

(edited by- pramod sarawale)