Corona Update : औरंगाबादेत आज शहरातील ५५, ग्रामीण भागातील १२ रुग्ण पॉझिटिव्ह; ८ हजार ९५३ रुग्ण झाले बरे.

मनोज साखरे 
Tuesday, 28 July 2020

आतापर्यंत १३ हजार ३१९ कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळले आहेत.  त्यापैकी ८ हजार ९५३ बरे झाले असून ४४९ जणांचा मृत्यू झाला. आता ३ हजार ९१७ जणांवर उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अंशतः ओसरला अशी शक्यता असून आज (ता. २८) सकाळच्या सत्रात ६७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ५५ आणि ग्रामीण भागातील १२ जणांचा समावेश आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

आतापर्यंत १३ हजार ३१९ कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळले आहेत.  त्यापैकी ८ हजार ९५३ बरे झाले असून ४४९ जणांचा मृत्यू झाला. आता ३ हजार ९१७ जणांवर उपचार सुरु आहेत.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 
शहरातील बाधित रुग्ण  (कंसात रुग्ण संख्या) :

उस्मानपुरा (१), पंचशील नगर, मोंढा नाका (१), मुकुंदवाडी (६), भगतसिंग नगर, हर्सुल (१), एमजीएम परिसर (१), छावणी परिसर (२), पृथ्वीराज नगर, शहानूरवाडी (१), एन सात सिडको (१), भाजी बाजार (४), गवळीपुरा, छावणी (४), देवळाई, सातारा परिसर (१), केबीएच नर्सिंग हॉस्टेल परिसर (२), श्रीकृष्ण नगर, एन नऊ सिडको (१), मिलिट्री हॉस्पीटल (१), न्यू हनुमान कॉलनी (१),  म्हाडा कॉलनी (१), राम नगर, मुकुंदवाडी (७), चिकलठाणा (२), संतोषी माता नगर, मुकुंदवाडी (१) उल्कानगरी (२), एन दोन सिडको (२), शिवाजी नगर (२), शांतीनाथ सो., (१), मिटमिटा (१), पद्मपुरा (२), उस्मानपुरा (५), अन्य (१) 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

ग्रामीण भागातील बाधित रुग्ण

साजापूर, वाळूज (१), बजाज नगर (१), गोंदेगाव, सोयगाव(१), सिडको महानगर वाळूज (१), गदाना (४), शिवाजी चौक, गंगापूर (१), जाधव गल्ली, गंगापूर (१), सावंगी, गंगापूर (१), मांडवा, गंगापूर (१)

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

कोरोना मीटर

  • बरे झालेले रुग्ण    -  ८९५३
  • उपचार घेणारे       -  ३९१७
  • आतापर्यंतचे मृत्यू  - ४४९
  • एकूण बाधित        - १३३१९

संपादन-प्रताप अवचार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auranagbad coronavirus today 67 corona positive patient