सावधान! औरंगाबादेतील १३ वसाहती बनल्या पुन्हा कोरोना‘हॉटस्पॉट’ 

माधव इतबारे
Tuesday, 8 December 2020

दुसरी लाट :  १३ भागात रुग्ण संख्या चारशेवर

औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट येणार म्हणून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यात शहरातील काही वसाहतींमध्ये वारंवार रुग्ण आढळून येत असून, अशा वसाहतींची संख्या १३ एवढी आहे. आत्तापर्यंतच विचार केला असता, रुग्णसंख्या सुमारे चारशेपर्यंत गेली आहे. 

शेतकऱ्यांच्या मानगुटीवर ‘आरटीओ’चे भूत, ओव्हरलोडिंगच्या नावाखाली लूट

 

शहरात कोरोना संसर्ग कमी होत असतानाच दसरा व दिवाळीचे सण आले. त्यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली. ही गर्दी कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास कारणीभूत ठरली आहे. ५० ते ६० वर आलेली रुग्ण संख्या पुन्हा शंभरपेक्षा जास्त झाली होती. दरम्यान, शासनाने दुसऱ्या लाटेची भिती व्यक्त केली व आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. त्यात दिल्लीसह इतर चार राज्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या औरंगाबाद जिल्ह्याच्या ग्रामीण भागापेक्षा शहरात कोरोना रूग्णवाढीचे प्रमाण अधिक आहे. कोरोना संसर्गाच्या सुरवातीच्या काळातील १३ वसाहतींतच रूग्ण आढळून येत असल्याचे समोर आले आहे.

बिबट्या सापडेना, शोधमोहीम गुंडाळण्याची तयारी; पंधरा दिवसांच्या मोहिमेत हाती काहीच नाही

या आहेत वसाहती  
वसाहती एकूण रूग्ण मृत्यु बरे झालेले उपचार घेणारे 

 • सिडको एन-२ परिसर ४२१ ०८ ३३२ ८१ 
 • सिडको एन-६ परिसर ४४७ १६ ३४० ९१ 
 • संजयनगर, मुकूंदवाडी ५०८ ३० ४७३ ०५ 
 • चिकलठाणा परिसर ४०९ २० २७८ १११ 
 • बीड बायपास, देवळाई परिसर ४६४ १२ २७२ १८० 
 • पदमपुरा, कोकणवाडी परिसर ४१५ ११ ३०४ १०० 
 • उस्मानपुरा-एकनाथनगर परिसर ४३७ १८ २७३ १४६ 
 • कांचनवाडी, विटखेडा, नक्षत्रवाडी ६२३ ०६ ३५७ २६० 
 • शिवशंकर कॉलनी, भानुदासनगर ४०१ १३ ३६१ २७ 
 • जयभवानीनगर, हनुमाननगर ४५८ १५ ४२९ १४ 
 • जाधववाडी, जटवाडा, हर्सूल ९३६ ४९ ७४४ १४३ 
 • गारखेडा, हुसेन व जवाहर कॉलनी ७८१ ३३ ६०७ १४१ 
 • सातारा परिसर, भारत बटालियन ७२६ १० ४५६ २६०

(संपादन-गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad 13 area make corona hotspot