esakal | रिक्षाचालक झालेत त्रस्त! (वाचा : काय आहे प्रकरण) 
sakal

बोलून बातमी शोधा

photo

शहरातील रिक्षाचालकांच्या न्याय्य मागण्या पाच वर्षांपासून प्रलंबित आहेत. सध्या रिक्षाचालकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. मागेल त्याला रिक्षा परवाना दिल्याने रिक्षाचालकांची संख्या 35 हजारांच्या घरात गेली आहे. शहरात प्रचंड रिक्षांची संख्या वाढल्यामुळे रिक्षाचालकांना रोजगार मिळवणे अवघड झाले आहे.

रिक्षाचालक झालेत त्रस्त! (वाचा : काय आहे प्रकरण) 

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : रिक्षाचालकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. वारंवार मागणी करुनही रिक्षाचालकांचे प्रश्‍न सोडवल्या जात नाहीत, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रादेशिक प्राधिकरण समितीची बैठक घेऊन तातडीने प्रश्‍न मार्गी लावावेत अशी मागणी रिक्षा संयुक्त संघर्ष कृती महासंघातर्फे करण्यात आली आहे. 

शहरातील रिक्षाचालकांच्या न्याय्य मागण्या पाच वर्षांपासून प्रलंबित आहेत. सध्या रिक्षाचालकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. मागेल त्याला रिक्षा परवाना दिल्याने रिक्षाचालकांची संख्या 35 हजारांच्या घरात गेली आहे. शहरात प्रचंड रिक्षांची संख्या वाढल्यामुळे रिक्षाचालकांना रोजगार मिळवणे अवघड झाले आहे. रिक्षाचालकांना कौटुंबिक ओढाताण सहन करावी लागत आहे. रिक्षाचालकांना त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देता येत नाही. त्यामुळे रिक्षाचालकांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

क्‍लिक करा : वाहनांच्या फास्टॅगला लागलाय ब्रेक 

काय आहे समस्या 

रिक्षाचालकांच्या विविध अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरात गेल्या पाच वर्षापासून नविन थांबे निश्‍चित करण्यात आलेले नाहीत. वारंवार मागणी करुनही जिल्हा प्राधिकरण परिवहन समितीने साधी दखलही घेतली नाही. एकीकडे रिक्षाचालक दिवसभर दोन पाच रुपये मिळवण्यासाठी धडपडत असताना, दुसरीकडे पोलिसांचा त्रास कमी होत नाही. रिक्षाचालकांना चौकात थांबण्यासाठी थांबे दिले जात नाही. जे थांबे आहेत, त्या थांब्यावर कुठलीही सुविधा दिली जात नाही. महापालिकेने थांबे निश्‍चित करुन त्या ठिकाणी पाटी लावणे आवश्‍यक आहे. मात्र महापालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. 

​हेही वाचा : उदयनराजेंद्र राऊतांच्या प्रश्‍नाचे उत्तर द्यावे 

भरमसाठ वाढल्या रिक्षा 

तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंत्रीमंडळाचा पदभार घेतला त्यानंतर लगेचच राज्यभर रिक्षा परवाने (परमिट) खुले केले. त्यामुळेच शहरामध्ये शहरात रिक्षांची संख्या 35 हजारापेक्षा अधिक झाली आहे. रिक्षांची संख्या वाढल्यामुळे रिक्षाचालकांना व्यावसाय मिळणे अवघड झाले आहे. या शिवाय भरमसाठ रिक्षा वाढल्याने वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. 

काय आहेत मागण्या 

रिक्षाचालकांसाठी महामंडळ स्थापन करावे, रिक्षांचे खुले परवाने देणे बंद करावे, विमा दरात झालेली भरमसाट वाढ कमी करावी, शेअर रिक्षाचे किलोमीटरप्रमाणे दर ठरवून कार्ड वितरित करावे. त्याचप्रमाणे गरजेनुसार रिक्षाथांबे वाढवण्यात यावेत आदी मागण्या संघटनेचे अध्यक्ष निसार अहेमद खान, सरचिटणीस कैलास शिंदे, कार्याध्यक्ष एस. के. खलील यांनी केल्या आहेत. 

go to top