वाळूज येथील भाजी मंडई हटवण्यावरून भाजप आक्रमक; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

BJP andolan
BJP andolan

औरंगाबाद: वाळूज एमआयडीसीतील मोहटा देवी मंदिरासमोर असलेली भाजी मंडई पोलिसांनी हटवली. या कारवाईविरोधात भारतीय जनता पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. मंगळवारी (ता.९) मध्यरात्रीपासून भाजपतर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मध्यरात्री भाजपने चांगलाच गदारोळ केला. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. बुधवारी (ता.१०)सकाळी साडेदहाच्या सुमारास आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

वाळूज एमआयडीसीतील भाजी मंडई पोलीस बंदोबस्तात हटवण्याचे काम प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. गेल्या 25 वर्षांपासून असलेली ही भाजी मंडई हटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. आता यावर कारवाई सुरू होत असताना स्थानिक नागरिक, भाजप व भाजीविक्रेत्यांतर्फे भाजी मंडई हटवण्यास विरोध करण्यात आला. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांच्या नेतृत्वाखाली रात्री साडेअकरा वाजल्यापासून भाजीमंडई येथील अतिक्रमण हटवले च्या जागी आंदोलन सुरू केले.

सरकार काही ठराविक शिवसेनेच्या व आघाडी सरकारच्या राजकीय मंडळींनी ठरवून हा भूखंड  लिलावात काढावा याच उद्देशाने हे अतिक्रमण हटविण्याचे काम करण्यात येत आहे. असा आरोप भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी केला.

ही भाजी मंडई हटवण्यासाठी आमदार-खासदार महापालिका, सिडको प्रशासन, एमआयडीसी व पोलीस यांना निवेदने दिली मात्र कोणीही आमची दखल घेतली नाही. याविषयी एक तारखेपासून उपोषण सुरू केले असे, आंदोलनकर्त्या व भाजीविक्रेता महिलेने सांगितले. दरम्यान कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी पुन्हा ही भाजी मंडई हटवण्याचे काम सुरू केले आहे. ताब्यात घेतल्यानंतर भाजप आमदार अतुल सावे यांनी वाळूज येथील भाजी मंडईचे ठिकाणी भेट दिली.

"भाजी विक्रेत्यांना सारी जागेचे व्यवस्था करून त्यांना दोन ते तीन दिवसाचा अवधी देण्यात यावा.कोरोनामुळे या विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहेत सरकारने या लोकांच्या पर्यायी जागेचा विचार करूनच ही भाजी मंडई हटवावी" -आमदार अतुल सावे

(edited by- pramod sarawale) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com