Breaking: औरंगाबादेत कोरोनाचा नवा उच्चांक; १ हजार ७९१ जण कोरोनाबाधित, २५ जणांचा मृत्यू

Aurangabad Corona Updates
Aurangabad Corona Updates

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.२३) १ हजार ७९१ जण कोरोनाबाधित आढळले. ही आजपर्यंतच सर्वात उच्चांकी रुग्णसंख्या आहे. आज तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला असून एका दिवसात मृतांची ही सर्वात मोठा आकडा आहे. आतापर्यंत एकूण १ हजार ४६४ जणांचा मृत्यू झाला. आज आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये महापालिका क्षेत्रात १ हजार २५३ व ग्रामीण भागात ५३८ जणांचा समावेश आहे. आज जिल्ह्यात ६३६ जणांना सुटी देण्यात झाली. आजपर्यंत ५६ हजार १३८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्या १२ हजार ९४९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


औरंगाबादेत २५ जणांचे मृत्यू
घाटी रुग्णालयात देभेगाव (ता. कन्नड) येथील ७० वर्षीय पुरुष, विवेकानंद नगर येथील ७० वर्षीय महिला, चंद्रनगर सिडको येथील ६३ वर्षीय पुरुष, कन्नड साखर कारखाना येथील ६५ वर्षीय पुरुष, पडेगाव येथील ६९ वर्षीय महिला, शाहाबाजार येथील ६२ वर्षीय पुरुष जामाडी (ता. औरंगाबाद) येथील ६८ वर्षीय महिला, सिडको एन-नऊ येथील ५८ वर्षीय पुरुष, गारखेडा येथील ८५ वर्षीय पुरुष, पैठण येथील ७२ वर्षीय महिला, शिरसगाव (ता. कन्नड) येथील ८० वर्षीय पुरुष, स्नेहनगर (ता. सिल्लोड) येथील ३७ वर्षीय महिला, हडको येथील ७४ वर्षीय पुरुष, त्रिवेणीनगर रोशनगेट येथील ५२ वर्षीय पुरुष, पानदरीबा औरंगाबाद येथील ७२ वर्षीय महिला, भिमनगर, भावसिंगपूरा येथील ६२ वर्षीय पुरुष, भाजी मंडी रोड येथील ६३ वर्षीय पुरुष, खुलताबाद येथील ३५ वर्षीय पुरुष, सिद्धार्थनगर एन-१२ हडको येथील ६९ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तसेच खासगी रुग्णालयात सहा जणांचा मृत्यू झाला.


---
करोना मीटर
---
बरे झालेले रुग्ण : १२९४९
उपचार घेणारे रुग्ण : ५६१३८
एकुण मृत्यू : १४६४
----
एकुण बाधित : ७०५७१
----

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com