वाळूज परिसरात माथेफिरुंनी पेटवून दिल्या दोन दुचाकी, दोन लाखांच्यावर नुकसान

Waluj Crime News
Waluj Crime News

वाळूज (जि.औरंगाबाद) : वाळूज परिसरातील जोगेश्वरी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील कमळापूर येथे एकाच घरातील दोन दुचाकींना अज्ञाताने आग लावून जाळून टाकल्या. ही घटना सोमवारी (ता.आठ) भल्या पहाटे एक वाजेच्या सुमारास घडली. संजय संभाजी बांगर हे कुटुंबासह जोगेश्वरी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कमळापूर येथील छत्रपती विहार येथे राहतात. त्यांच्याकडे होंडा शाइन व स्कुटी. अशा दोन दुचाकी असून दोन्ही दुचाकी गाड्या आहेत. या दोन्ही दुचाकींची किंमत दोन लाखांच्यावर असल्याचे बांगर कुटुंबाने सांगितले. सोमवारी (ता.आठ) रोजी भल्या पहाटे एक वाजेच्या सुमारास अज्ञातांनी या दुचाकीला आग लावली.

आग भडकल्याने दुचाकीचा समोरील हेडलाईट फुटला. त्यामुळे झालेल्या आवाजाने सोसायटीतील नागरिक व बांगर कुटुंब धाव घेत आग आटोक्यात आणली. या आगीत दुचाकी (एमएच 20 एफएम 1143) व स्कुटी (एमएच20 एफएस 7578) या दोन्ही दुचाकी जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी दुचाकी मालक विकी संजय बांगर व सुरज संजय बांगर यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
 
हेही वाचा - Maharashtra Budget 2021: राज्याच्या अर्थसंकल्पात मराठवाड्याचा रेल्वेप्रश्न 'जैसे थे', पर्यटन राजधानी औरंगाबादला ठेंगा


दोन मोबाईल लंपास
दरम्यान याच छत्रपती विहार सोसायटीत शुक्रवारी (ता.सहा) रोजी अज्ञात चोरट्यांनी दोन घराच्या खिडकीत ठेवलेले जवळ-जवळ चोवीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. या घटनेनंतर परिसरात पोलिसांची गस्त घालावी, अशी मागणी जोगेश्वरी ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन बोंबले, माजी सरपंच सोनू अमोल लोहकरे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com