esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Malik Ambar Built Aurangabad City

यौद्धा असलेला मलिक अंबर हा आफ्रिका खंडातील गुलाम होता.

तुम्हाला माहीत आहे का? एकेकाळी आफ्रिकन गुलाम असलेल्या माणसाने वसवले औरंगाबाद

sakal_logo
By
ई सकाळ टीम

औरंगाबाद : सध्या औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करावे यावरुन राजकारण सुरु आहे. शिवसेना तर अगोदरपासूनच संभाजीनगर असा उल्लेख करत आली आहे. औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आफ्रिकेतील गुलाम मलिक अंबर या निजामशाहीतील एका कर्तबगार प्रधानाने वसवले आहे. त्यावेळेस शहराचे नाव खडकी असे होते. मोगल बादशहा औरंगजेब याने शहराचे नाव औरंगाबाद असे केले. तर  औरंगाबाद शहर वसवणाऱ्या मलिक अंबर विषयी जाणून घेऊ या....

मामाचा नाद खूळा ! भाचा सैनिक झाला म्हणून दिलं 'गाव जेवण'

आफ्रिकेतला गुलाम
यौद्धा असलेला मलिक अंबर हा आफ्रिका खंडातील गुलाम होता. त्याचा जन्म इथोपिया या देशातील दक्षिणेकडील खंबाटा प्रदेशात झाला होता. मलिक अंबर हा ओरोमो या आदिवासी जमातीतील वांशिक गटात वाढला. सध्या  इथोपियातील लोकसंख्येत हा वांशिक गट जवळजवळ ३५ टक्के आहे. या देशात सतत युद्ध सुरु होते. दारिद्र्याने पीडलेल्या आईवडिलांनी गरिबीमुळे मलिक अंबरला विकले. त्याची अनेकदा गुलाम म्हणून विक्री व खरेदी करण्यात आली होती. यातून तो जिवंत असे पर्यंत दख्खनचा भाग मोगलांपासून त्याने सुरक्षित ठेवले होते. इतिहासकार रिचर्ड ए इटन अ सोशल हिस्टरी आॅफ डेक्कन, १३००-१७६१ एट इंडियन लाईव्हज या पुस्तकात म्हणतात, की चाम्पूची (मलिक अंबर या नावाने ओळखले जात होते) रेड सी पोर्ट आॅफ मोचा (येमेन) काही ऐंशी डच गिल्डर्समध्ये विकण्यात आले.  तेव्हा त्याला बगदादमध्ये घेऊन जाण्यात आले. येथे त्याला होतकरु व्यापाऱ्याला विकण्यात आले. त्याला चाम्पूमधील चांगले गुण दिसल्याने त्याने त्याला वाढवले व शिक्षित केले. त्याला इस्लाममध्ये धर्मांतरीत केले व त्याला अंबर असे नाव दिले.

पत्नी संजनाने मारली बाजी, माजी आमदार हर्षवर्धन जाधवांची ‘किंग मेकर’ची भूमिका फोल 


गुलाम हे कायम राहत नाहीत
दख्खन येथील समाज व्यवस्थेत गुलामांची ‘जैसे थे स्थिती’ राहत नसे. मालकाच्या मृत्यूनंतर ते मुक्त होत असे. ती त्यांच्या इच्छेनुसार शक्तीशाली सरसेनापतीच्या साम्राज्यात काम करित होते. काही गुलाम तर सर्वोच्च यश शिखर गाठून महत्त्वाची भूमिका बजावत. हे सर्व मलिक अंबरच्या बाबतीत घडले आहे. जंगीझखानचा मृत्यू झाल्यानंतर अंबर गुलामगिरीतून मुक्त झाला. पुढील वीस वर्षे त्याने शेजारच्या विजापूर सुलतानशाहीत काम केले. १५५० मध्ये मलिक अंबर अहमदनगर सुलतान शाहीत परतला. हाच काळ होता की मोगल बादशहा अकबर याचे लक्ष दख्खनकडे गेले आणि त्याने वेगाने अहमदनगरच्या दिशेने लष्कर पाठविण्यास सुरुवात केली. अहमदनगरवरील मोगलांच्या हल्ल्याच्या दरम्यान एक वेगळ व्यक्तिमत्त्व म्हणून मलिक अंबर पुढे आला, अशी नोंद इतिहासकर मनू एस पिल्लई यांनी रेबल सुलतान : द डेक्कन फ्रॉम खिलजी टू शिवाजी या पुस्तकात केली आहे. मलिक अंबर याने आपली मुलगी अहमदनगरच्या राजघराण्यात दिली. यामुळे पुढे तो भविष्यामधील मोगलांविरोधात निजामशाहीतील राज्यकर्ता म्हणून पुढे आणला. मलिक अंबर हा मुख्य ताकद म्हणून अहमदनगर राज्यात उदयास आला. असे म्हटले जाते की पश्‍चिम दख्खनमधील निजामशाहीचा अंबरभूमी म्हणून उल्लेख केला जात होता, असे इतिहासकार पिलाई सांगतात. ईटन आपल्या पुस्तकात म्हणतात, की अनेक सेनापती दिल्लीतून दक्षिणेतील मलिक अंबरला हरविण्यासाठी आले. पण ते सर्व अयशस्वी ठरले. 

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

खुलताबादेत कबर
साधारण १५७० मध्ये अंबरला दक्षिण भारतात आणले गेले. येथे चंगीझखान याने त्याला विकत घेतले. चंगीझखान याचा मृत्यू झाल्यानंतर मलिक गुलामगिरीतून मुक्त झाला. पुढील २० वर्षे त्याने विजापूरमध्ये सेवा केली. येथे त्याला छोट्या सैन्य तुकडीची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यातून त्याचा मृत्यू झाल्यानंतर दहा वर्षांत मोगलांनी दख्खन ताब्यात घेतला. मलिक अंबरचा १६२६ मध्ये मृत्यू झाला. त्याची कबर औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे. ती शहरापासून जवळजवळ ३० किलोमीटरपासून लांब आहे.

संपादन - गणेश पिटेकर


 

go to top