मंत्रिमंडळात शहराची पाटी कोरीच

माधव इतबारे
Monday, 30 December 2019

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याला मंत्रीमंडळ विस्तारात दोन मंत्रीपदे मिळाली असली, तरी शहराची पाटी मात्र कोरी राहिली आहे.

औरंगाबाद : आमदारकीची हॅट्ट्रिक करणाऱ्या संजय शिरसाट यांचे नाव शेवटपर्यंत चर्चेत राहिले मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना शहरातून मंत्रीपद देईल, या चर्चेलादेखील आता पूर्णविराम मिळाला आहे.

त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याला मंत्रीमंडळ विस्तारात दोन मंत्रीपदे मिळाली असली, तरी शहराची पाटी मात्र कोरी राहिली आहे.

Image result for sanjay shirsat mla aurangabad

युती सरकारमध्ये शेवटी-शेवटी भाजपने अतुल सावे यांची वर्णी लावली. नऊ ते दहा महिन्याच्या काळात राज्यमंत्री म्हणून काम करताना श्री. सावे यांनी शहरासाठी 1680 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली. रस्त्यासाठी मोठा निधी आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र महापालिका पदाधिकाऱ्यांची त्यांना साथ मिळाली नाही. 

औरंगाबादला मिळाली दोन मंत्रिपदे - कोण ते वाचा

दरम्यान राज्यात नाट्यमय घडामोडींनंतर सत्तेचा प्रमुख दावेदार पक्ष भाजप विरोधी पक्षात बसला व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. मंत्रीमंडळाचा विस्तार करताना ठाकरे एप्रिल 2020 मध्ये महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन शहरातील आमदार संजय शिरसाट यांची वर्णी लावतील अशी चर्चा होता. 

शिवसेनेचे संजय शिरसाट पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. यावेळचा त्यांनी मिळवलेली विजय खास समजला जातो. कारण संजय शिरसाट यांच्या विरोधात भाजपने राजू शिंदे यांना बंडखोरी करायला लावून रसद पुरवल्याचे बोलले जाते. अशा परिस्थितीत शिरसाट यांनी मोठ्या मताधिक्‍याने पश्‍चिमची जागा कायम राखली. 

Image result for sanjay shirsat mla aurangabad

नाव शेवटपर्यंत चर्चेत

शिवाय शिरसाट हे जुने शिवसैनिक आहेत, संघटनेच्या पदापासून महापालिकेत नगरसेवक, आमदार असा त्यांचा चढता आलेख राहिलेला आहे. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद देऊन त्यांचा योग्य तो सन्मान पक्षाकडून केला जाईल, अशी चर्चा शिवसैनिकात होती. त्यांचे नाव देखील शेवटपर्यंत चर्चेत होते. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेले अब्दुल सत्तार व पाचवेळा आमदार राहिलेले संदीपान भुमरे यांना संधी मिळाली. 

मोलमजुरी ते हमाली

सत्तार सिल्लोड तर भुमरे पैठण मतदारसंघातील असून, शहराची पाटी मात्र कोरीच राहिली आहे. शहरातून यापूर्वी अनेक दिग्गज नेत्यांनी मंत्रीपदे भूषविली आहेत. त्यात श्री. शिरसाट यांना वर्णी लावता आलेली नाही.

मंत्रीमंडळात वर्णी लागलेले शहरातील दिग्गज 

कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने अनेकांना मंत्रीमंडळात संधी दिली. त्यात डॉ. रफिक झकेरिया, बाबूराव काळे, चंद्रकांत खैरे, प्रीतमकुमार शेगावकर, गंगाधर गाडे, राजेंद्र दर्डा, अतुल सावे यांच्यासह इतरांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad City has No Representation in in Maharashtra government