औरंगाबादेत आणखी एका माजी नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

पडेगावचे माजी नगरसेवक यांचा एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी (ता. आठ) पहाटे मृत्यू झाला. आठ दिवसापूर्वी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. घाटी रुग्णालयातून त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.

औरंगाबाद : पडेगावचे माजी नगरसेवक यांचा एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी (ता. आठ) पहाटे मृत्यू झाला. आठ दिवसापूर्वी त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. घाटी रुग्णालयातून त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

२०१५ झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत ते शिवसेनेतर्फे निवडून आले होते. २३ जूनला त्यांनी स्वब दिला होता. २४ जूनला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

मंगळवारी देखील एका नगरसेवकाचा मृत्यू 

शहरात कोरोना विषाणूचा कहर सुरूच असून मंगळवारी (ता. सात ) एका माजी नगरसेवकाचा बळी घेतला. शिवसेनेचे उत्तम नगर बौध्‍द नगर वाँर्डाचे माजी नगरसेवक यांचा मृत्यू झाला. शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात नागरिकांच्या मदतीसाठी काम करणारे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी यांना देखील कोरोनाची लागला होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad city one more ex corporter Corona Death