esakal | 'ती'च्या येण्याने औरंगाबाद शहराला भरले कापरे
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad City Temperature Decrease

शहरात शुक्रवारी (ता.17) या वर्षातील सर्वांत कमी 8.1 अंश सेल्सिअस इतक्‍या कमी तापमानाची नोंद चिकलठाणा वेधशाळेत झाली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी (ता.16) तापमान 15.5 अंश सेल्सिअस इतके होते.

'ती'च्या येण्याने औरंगाबाद शहराला भरले कापरे

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद - दिवसाचे तापमान जास्त तर रात्रीत अंगाला झोंबणारा गारवा हा गहू, हरभऱ्यासाठी लाभदायी असला तरी माणसांना उबदार कपडे अंगात चढवायला भाग पाडणारा आहे.

शीतलहरीच्या येण्याने समुद्रसपाटीपासून उंचीवरच्या भागात बर्फाळ स्थिती निर्माण होते तर कमी उंचीच्या प्रदेशात थंडीचा गारठा वाढतो. या शीतलहरींच्या दख्खनच्या पठारावर आगमनामुळे ही अंग गोठवणारी थंडी जाणवत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी मत व्यक्‍त केले आहे. 

शहरात शुक्रवारी (ता.17) या वर्षातील सर्वांत कमी 8.1 अंश सेल्सिअस इतक्‍या कमी तापमानाची नोंद चिकलठाणा वेधशाळेत झाली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी (ता.16) तापमान 15.5 अंश सेल्सिअस इतके होते. थंड वारे वाहत असल्याने किमान आणि कमाल तापमानात घट झाली आहे. या अगोदर 28 डिसेंबरला तापमान हे 10.9 अंश सेल्सिअस एवढे होते. आता 17 जानेवारीला शहरात या वर्षातील सर्वांत कमी 8.1 अंश सेल्सिअस इतक्‍या तापमानाची नोंद झाली. 


शीतलहरींचा हा परिणाम 

या पार्श्‍वभूमीवर थंडीच्या लाटेविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. मदन सूर्यवंशी म्हणाले, मकर संक्रांतीपासून सूर्य मकर वृत्तात येतो आणि उत्तरायण सुरू होते. दिवस मोठा होत जातो तर रात्र लहान होत जाते. हवेतील आर्द्रता (थंडावा) कमी होत जाउन उन्ह वाढायला सुरवात होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील थंडी संपत असते. मात्र, यंदा मराठवाड्यात यंदा म्हणावी थंडी तशी जाणवलीच नाही. आता मराठवाड्यातील थंडी फार तर वीस ते पंचवीस दिवस राहिली आहे. सध्याचे जे दिवसा तापमान जास्त आणि रात्री थंडी हे जाणवत आहे त्याचे कारण म्हणजे शीतलहरी आहेत. या शीतलहरीमुळे पंजाब, हरियाना, हिमाचलप्रदेश पूर्णपणे गारठलाय, तिथे बर्फाळ स्थिती आहे तर या लहरी दख्खनपर्यंत आल्याने थंडीचे स्ट्रोक जाणवत आहेत. या शितलहरीच्या काळात जिथे समुद्रसपाटीपासून जास्त उंचीचा प्रदेश असतो तिथे बर्फाळ स्थिती तर कमी
उंचीच्या ठिकाणी थंडी अशी स्थिती असते. आणखी तीन चार दिवस हे थंडीचे स्ट्रोक जाणवतील. 

काय असते थंडी 

थंडी वाजते असे आपण म्हणतो; मात्र ही थंडी नेमकी काय असते याविषयी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, "पृथ्वी नैसर्गिकरीत्या साडेतेवीस अंशांनी कललेली असून, तिचा अक्ष ऋतूनिर्मिती करीत असतो. ज्यावेळी सूर्याची किरणे पृथ्वीच्या भूपृष्ठावर येतात विशेषत: महाराष्ट्र, भारताचा विचार केला तर ती तिरपी येतात. त्यामुळे भूपृष्ठावरील उष्णतेत आपोआप घट होत असते. उष्णतेत घट झाल्याने हवेत असलेला गारवा आपोआप जाणवायला लागतो. थंडी जाणवायला लागते. त्यालाच हिवाळा म्हणतात. 

हेही वाचा - 

...तर संजय राऊतांचं तोंड वंगणानं काळं करू

आंतरराष्ट्रीय गाजलेले चित्रपट पाहायचेत? चला औरंगाबादला! 

अॅकॅडमिक ऑडिट नसल्यास महाविद्यालयांचे संलग्निकरण रद्द