पाणी पुरवठ्याच्या निविदेला का दिली पाचव्यांदा मुदतवाढ वाचा...

amc aurangabad
amc aurangabad

औरंगाबाद-राज्य शासनाने मंजूर केलेल्या नव्या पाणी पुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत रावबिली जात आहे. मात्र जीवन प्राधिकरणाने तब्बल पाचव्यांदा निविदेस मुदतवाढ दिली आहे. आता चार फेब्रुवारी ही निविदा स्वीकारण्याची अंतिम मुदत करण्यात आली आहे.

राज्य शासनाने शहरासाठी 1680 कोटी रुपयांच्या नव्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी दिली आहे. हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत केले जाणार आहे. त्यानुसार प्राधिकरणाने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधीच पहिल्या टप्प्यातील 1308 कोटींच्या कामांची निविदा प्रसिद्ध केली होती. मात्र, यापूर्वी चारवेळी निविदेला मुदतवाढ देण्यात आली होती. शनिवारी (ता. 25) निविदा भरण्याची मुदत संपली. मात्र पुन्हा एकदा ठेकेदार कंपन्यांनी जीवन प्राधिकरणाकडे मुदतवाढीची मागणी केली. त्यामुळे पाचव्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. आता चार फेब्रुवारीपर्यंत निविदा स्वीकारल्या जाणार आहेत. 

कंपन्यांकडून वारंवार होतेय मागणी 
पाणीपुरवठा योजनेची निविदा भरण्यासाठी अनेक कंपन्या इच्छुक आहेत. या कंपन्यांकडून वारंवार निविदा भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली जात आहे. आता निविदा भरण्याची अंतिम मुदत 25 जानेवारी होती. पण त्याच्या एक दिवस आधीच आठ कंपन्यांनी जीवन प्राधिकरणाकडे मुदतवाढीच्या मागणीचे पत्र दिले. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी काही अवधी लागणार आहे. त्यामुळे मुदतवाढ द्यावी अशी मागणी त्यात करण्यात आली. त्यानुसार जीवन प्राधिकरणाने आठवडाभराची मुदत वाढवून दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

"त्या' दोन अटी फेटाळल्या 
शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी दरवर्षी वाढत जाणाऱ्या किमतीस मंजूरी देणे व मोबेलायझेशन रक्कम (काम सुरू करण्यापूर्वी पैसे देणे) देणे या दोन्ही अटी नगरविकास विभागाने फेटाळल्या आहेत, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजयसिंग यांनी शुक्रवारी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com