धक्के सुरुच औरंगाबादेत आणखी तीन कोरोना पाॅझिटीव्ह

धक्के सुरुच औरंगाबादेत आणखी तीन कोरोना पाॅझिटीव्ह


औरंगाबादः शहरात आखणी तिघांना कोरोनाची बाधा झाली असून कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. कोरोना बाधितांमध्ये २ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तिघेही यापूर्वीच्या बाधित रुग्णांच्या कुटुंबीतील सदस्य आहे. यामध्ये देवळाई परिसरातील दोन तर जलाल कॉलनी येथील एकाचा समावेश आहे. या सर्वांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली. 

तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील आकडा १४ झाला आहे. यामध्ये १४ पैकी १२ जणांवर सध्या उपचार सुरू असून एक रुग्ण बरा झाला तर एकाचा मृत्यु झालेला आहे. औरंगाबाद शहरात ज्या भागात कोरोनाग्रस्त सापडले आहे. ते भाग पोलिस प्रशासनाकडून सील करण्यात आले असून महापालिकेकडून सर्वे करण्यात आला आहे. 

मराठवाड्यात ९९ ठिकाणी क्वारंटाइन व्यवस्था 

मराठवाड्यात आठ हजार ३१४ बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विभागांमध्ये कोरोनासंदर्भात एक हजार ९२ खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी स्वतंत्र १६ समर्पित रुग्णालयाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये एक हजार ३०० खाटांची सुविधा आहे. 

१३ हजार प्लेटलेट बॅग उपलब्ध 

विभागातील रक्तपेढीमध्ये आजघडीला ७९७ होल ब्लड, आठ हजार ७८८ पीसीव्ही, १३ हजार ७१८ प्लाझ्मा (एफएफपी) व २६२ प्लेटलेट बॅग उपलब्ध आहेत. रक्तसाठा व इतर संकलन वाढवण्यासाठी जिल्ह्यातील रक्तदात्यांना आव्हनाचे निर्देशन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. विभागात १५६ व्हेंटिलेटर आणि दोन हजार ९८४ पीपीई किट आणि ३९ हजार ६२ एन-९५ मास्क उपलब्ध आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com