Coronavirus: आज औरंगाबादेत वाढले एवढे रुग्ण, तर आता ३ हजार ८१९ जणांवर उपचार सुरु  

मनोज साखरे 
Friday, 17 July 2020

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. पण लॉकडाउनमध्ये टेस्टिंगही वाढत असल्याने रुग्णसंख्येत मोठा फुगवटा दिसत आहे. जिल्ह्यात आज (ता.१७) सकाळी ८८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ४२ रुग्ण, ग्रामीण भागातील ४० रुग्ण आणि अँटीजेन टेस्टमध्ये आढळलेल्या ६ रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. पण लॉकडाउनमध्ये टेस्टिंगही वाढत असल्याने रुग्णसंख्येत मोठा फुगवटा दिसत आहे. जिल्ह्यात आज (ता.१७) सकाळी ८८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ४२ रुग्ण, ग्रामीण भागातील ४० रुग्ण आणि अँटीजेन टेस्टमध्ये आढळलेल्या ६ रुग्णाचा समावेश आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

आतापर्यंत जिल्ह्यात ९ हजार ८३२ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ५ हजार ६३६ बरे झाले. एकूण ३७७ जणांचा मृत्यू झाला असून आता ३ हजार ८१९ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये सहा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

या भागातील बाधित (कंसात रुग्ण संख्या) :

शहरातील ४२ बाधित रुग्ण : एनआरएच हॉस्टेल (१), बेगमपुरा (१), गारखेडा (१), केळी बाजार (१), जटवाडा (१), चैतन्य नगर, हर्सुल (१), जवाहर नगर पोलिस स्टेशन जवळ (१), पद्मपुरा (१), बन्सीलाल नगर (२),क्रांती नगर (९),  राधास्वामी कॉलन, हर्सुल (१) एन अकरा (१), अयोध्या नगर (१), पवन नगर (२), शिवाजी नगर (१), अविष्कार कॉलनी (१), प्रकाश नगर (१), ठाकरे नगर (१), जय भवानी नगर (१), एन चार सिडको (२), एन आठ सिडको (१), श्रद्धा नगर (१), एन दोन राजीव गांधी नगर (१), एन तीन सिडको (१), एन सहा, सिडको (१), चिकलठाणा (१), एन सहा संभाजी कॉलनी (१), बालाजी नगर (२), नक्षत्रवाडी (१), अन्य (१)

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

ग्रामीण भागातील ४० बाधित रुग्ण : 

रांजणगाव (१), फुलंब्री (४),फुलंब्री पोस्ट ऑफिस समोर, फुलंब्री (१),  टिळक नगर, कन्नड (१), बोरगाव अर्ज, फुलंब्री (१), पळसवाडी, खुलताबाद (१), शेंद्रा कामंगर(४), कुंभेफळ (४), मोठी आळी, खुलताबाद (२), चित्तेगाव (७), भवानी नगर, पैठण (१), समता नगर, गंगापूर (१), शिक्षक कॉलनी, सिल्लोड (२),डोंगरगाव, सिल्लोड (१), पुरणवाडी, सिल्लोड (१), समता नगर, सिल्लोड (१), शिवाजी नगर, सिल्लोड(१), घाटनांद्रा सिल्लोड (१), शंकर कॉलनी, वैजापूर (१), कुलकर्णी गल्ली, वैजापूर (१), इंदिरा नगर, वैजापूर (१), अण्णाभाऊ साठे नगर, वैजापूर (१) देवगाव (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक    

कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण -५६३६
उपचार घेणारे रुग्ण -३८१९
एकूण मृत्यू - ३७७

आतापर्यंत एकूण बाधित  -९८३२


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update 88 positive increase