Corona Update : औरंगाबादेत आज ९१ रुग्णांची वाढ; बाधितांची संख्या वीस हजाराच्या घरात   

मनोज साखरे
Thursday, 20 August 2020

 जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ४९८ झाली आहे. यातील १४ हजार ६८९ रुग्ण बरे झाले असून ६०८ जणांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता.२०) सकाळच्या सत्रात ९१ रुग्णांचे अहवाल  पॉझिटिव्ह आले. आता ४ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ४९८ झाली आहे. यातील १४ हजार ६८९ रुग्ण बरे झाले असून ६०८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ हजार २०१ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

ग्रामीण भागातील बाधीत रुग्ण ५६ (कंसात रुग्ण संख्या) :   
साजापूर (१), नागद (१), वडगाव (२),  स्वामी समर्थ नगर, बजाज नगर (१), बजाज नगर (४), लेन नगर, वाळूज (१), बाप्तारा, वैजापूर (६), लासूर स्टेशन, गंगापूर (१५), साजातपूर, वैजापूर (१), पळसगाव, वेरूळ (१), परदेशीपुरा, पैठण (३), नवीन कावसान, पैठण (१), पिशोर, कन्नड (१), गंगापूर (१), गणपती गल्ली, गंगापूर (८), जयसिंगनगर (१), आंबेडकर चौक, वैजापूर (१), परदेशी गल्ली, वैजापूर (१), लक्ष्मी नगर, वैजापूर (१), परदेशी माढी, वैजापूर (१), दर्गाबेस, वैजापूर (१), पोलिस कॉलनी, वैजापूर (२), दुर्गावाडी, वैजापूर (१)

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

शहरातील बाधीत रुग्ण ३५ 

शताब्दी नगर (१), सिल्क मिल कॉलनी (१), पन्नालाल नगर (१), अन्य(१), पद्मपुरा (१), स्नेह नगर (२), रेणुका नगर (१), सूर्यदीप नगर (३), नक्षत्रवाडी (१), गारखेडा (१), एन अकरा, सूदर्शन नगर (१), एन आठ, सिडको (१), कॅनॉट प्लेस (१), बजाज नगर (१), श्रीकृष्ण नगर (१), एन सहा, अविष्कार कॉलनी (१), राधामोहन कॉलनी (२), महेश नगर (१), एसटी कॉलनी (१३)

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona Update 91 positive increase