घाबरू नका, कोरोना जातोय ! नवीन रुग्णापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले ! 

corona 12.jpg
corona 12.jpg

औरंगाबाद : कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करून घरी परतणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.६५३ वर पोचले आहे, तर मृत्युदरदेखील ३.१ टक्क्यांवर आला आहे. राज्याच्या तुलनेत मृत्युदर जास्त असला तरी सुरवातीच्या काळापेक्षा तो निम्म्याने कमी आहे. त्यामुळे शहरवासीयांसाठी दिलासादायक चित्र आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
कोरोनाचा कहर दिवसेंदिवस सर्वत्र वाढत आहे. मार्च महिन्यात एक-दोन रुग्ण आढळून आल्यानंतर नागरिकांमध्ये जी भीती होती ती दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे आता नागरिक शहरात बिनधास्तपणे फिरत आहेत. अनेक जण तर दंड भरू पण मास्क वापरायचा नाही, अशा आविर्भावात वावरत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे. काही दिवसांपासून शहरात रोजच्या रुग्णांची सरासरी तीनशे एवढी आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे कोरोनावर मात करून घरी परतणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ७२.६५३ एवढी आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधितांची आत्तापर्यंची संख्या २० हजार ६३५ आहे. त्यापैकी १४ हजार ९९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बुधवारी (ता. २३) २५७ नवे रुग्ण दाखल झाले आणि ८७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होत असल्याने मृत्युदरही कमी झाला आहे. राज्याचा मृत्युदर २.८ टक्के आहे, तर औरंगाबाद जिल्ह्यात २.९ टक्के. शहराचा मृत्युदर ३.१७९ एवढा आहे. दहा लाख लोकसंख्येमागे औरंगाबाद शहरात आत्तापर्यंत दोन लाख २२ हजार ५५४ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. हे प्रमाण मुंबई, पुणे वगळता राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत अधिक असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. 

कोरोनाचे निम्मे रुग्ण तरुण 
कोरोना विषाणूचा संसर्ग वयोवृद्धांसाठी धोकादायक असल्याचे सुरवातीपासून सांगितले जात आहे. त्यामुळे ५० वर्षांवरील व्यक्ती काळजी घेत असले तरी रुग्णांमध्ये तरुणांचा समावेश मोठा आहे. तब्बल ११ हजार ८९४ रुग्ण तरुण असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्याठी अत्यावश्‍यक कामांसाठीच बाहेर पडा. सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करा, असे आवाहन केले जात आहे. मात्र हे नियम सर्रास पायदळी तुडविले जात आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त आहे. महापालिकेने बुधवारी (ता. २३) दिलेल्या अहवालानुसार शहरात आतापर्यंत २० हजार ६३५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यात १८ ते पन्नास या वयोगटातील ११ हजार ८९४ जणांचा समावेश आहे. पन्नास आणि त्यापेक्षा जास्त वयाचे पाच हजार ५३८ जण कोरोनाबाधित आहेत. पाच ते १८ वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार ७२४ आहे तर शून्य ते पाच वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या ४७९ एवढी आहे. 

(संपादन-प्रताप अवचार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com