CORONA : औरंगाबादेत आज १५९ रुग्णांची वाढ; एकूण रुग्णसंख्या आठ हजार पार, तर ३ हजार ३०३ रुग्णांवर उपचार सुरू

corona.jpg
corona.jpg

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात सुरूच आहे. आज जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या १ हजार ३६१ स्वॅबपैकी १५९ रुग्णांचे (७९ पुरूष, ८० महिला) अहवाल शनिवारी (ता. ११) सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत ८१०८ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ४४६३ बरे झाले, ३४२ जणांचा मृत्यू झाला. तर ३३०३ जणांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

महापालिका हद्दीतील आजचे रुग्ण 
नक्षत्रवाडी (२), एन अकरा, सिडको (२), हर्सूल कारागृह परिसर (१), मुकुंदवाडी (१),  कांचनवाडी (१),  अन्य (२), राम नगर,चिकलठाणा (१), पडेगाव (३), विद्यापीठ गेट परिसर (१), उथर सो., हर्सुल (२), नवनाथ नगर (७), नवजीवन कॉलनी (२), रेणुका माता मंदिर परिसर (१), राजे संभाजी कॉलनी  (२),  राम नगर (६), छावणी (६), एन अकरा हडको (३), हर्सुल (१), बाबर कॉलनी (१), शिवशंकर कॉलनी (८), रत्नाकर कॉलनी, स्टेशन रोड (१), प्रियदर्शनी नगर, गारखेडा (१), प्रगती कॉलनी (१), एन बारा, हडको (१), किराणा चावडी (१), कोकणवाडी (२), काल्डा कॉर्नर (१), ज्योती नगर (१), द्वारकापुरी (१), पद्मुपरा (१),  जयसिंगपुरा (१), श्रद्धा कॉलनी (१), हनुमान नगर (१), शनि मंदिराजवळ, अदालत रोड (१), मीरा नगर, पडेगाव (१), गजानन नगर (१), विष्णू नगर (९), दौलताबाद टी पॉइंट परिसर (३), एन नऊ सिडको (१), एन सहा सिडको (७), हनुमान नगर (२), माऊली नगर, हर्सुल (१), हिमायत बाग (२), आदर्श कॉलनी, गारखेडा (१), रामकृष्ण नगर, गारखेडा (१), उल्का नगरी (२),  जय भवानी नगर (१), नारेगाव (३), अरिहंत नगर (१), लॉयन्स हॉस्पीटल परिसर (२), पुंडलिक नगर (३), बजाज सो., सातारा परिसर (१), ठाकरे नगर, सातारा परिसर (१), माऊली नगर (१) आढळले.

ग्रामीण भागातील आजचे रुग्ण 
 पैठण (१), वाळूज, गंगापूर (५), अजब नगर, वाळूज (१), सहारा सिटी, सिल्लोड (३), अंधारी सिल्लोड (१), मारवाड गल्ली, लासूरगाव (२), जनकल्याण मार्केट नगर, बजाज नगर (१), बसवेश्वर चौक, बजाज नगर (३), आनंदजनसागर कार्यालयाशेजारी, बजाज नगर (२), सिद्धीविनायक मंदिराशेजारी, बजाज नगर (१), आयोध्या नगर, वडगाव कोल्हाटी (२), फुले नगर, पंढरपूर (१), नेहा सो., बजाज  नगर (१), शिवालय चौक, बजाज नगर (१), संत एकनाथ शाळेजवळ, चित्तेगाव, पैठण (७), चिंचाळा, पैठण (३), वरूडकाझी (१), सावंगी (४), तेली गल्ली, संभाजी चौक, फुलंब्री (४), विवेकानंद कॉलनी, फुलंब्री (१), एनएमसी कॉलनी, वैजापूर (२) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

या ठिकाणी वाढले सर्वाधिक रुग्ण
शहरात दाट वस्ती असलेल्या भागात  रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. यात विष्णुनगर नऊ,शिवशंकर कॉलनीत आठ, नवनाथनगर-सात,सिडको एन-सहा,छावणी सहा,रामनगर-सहा रुग्ण वाढले आहेत.

कोरोना मीटर
बरे झालेले---४४६३
उपचार सुरु--३३०३
मृत्यू-------३४२
एकूण----८१०८

संपादन : प्रताप अवचार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com