कोरोना संसर्गाचा कुटुंबातील धोका वाढला, तब्बल ३१ कुटुंबातील ८० व्यक्ती निघाले पॉझिटिव्ह

Aurangabad Corona Updates
Aurangabad Corona Updates

औरंगाबाद : कोरोना संसर्गाचा कुटुंबातील धोका वाढला आहे. एकाच घरात अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह निघत आहेत. सध्या शहरात ३१ कुटुंबातील ८० व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्याचे समोर आले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमुळे हे रुग्ण समोर आल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी गुरुवारी (ता. २५) सांगितले.


शहराच्या सर्वच भागात फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाटयाने वाढत आहे. सातारा-देवळाई भागासह इतर ठिकाणी एकाच कुटुंबातील चार ते पाच व्यक्ती बाधित आढळून येत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे या भागात महापालिकेने आरोग्य पथके पाठवून तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. आत्तापर्यंत ३१ कुटुंबे बाधित सापडले असून, या कुटुंबातील ८० व्यक्ती पॉझिटिव्ह निघाले आहेत, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

मेल्ट्रॉन, पदमपूरा,एमजीएम सेंटर फुल्ल
शहरातील कोविड केअर पुन्हा एकदा फुल्ल होत आहेत. मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरची क्षमता ३०० बेडची आहे. सध्या या ठिकाणी ३१० रुग्ण उपचार घेत आहेत. पदमपुरा सेंटरमध्ये ५३ बेड आहेत, ५६ रुग्ण उपचार घेत आहेत. एमजीएम स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे ७५ ची क्षमता आहे. ७३ रुग्ण दाखल आहेत. किलेअर्कची क्षमता ३५० आहे. सध्या याठिकाणी ८३ रुग्ण आहेत, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.


ॲक्टीव्ह रुग्णसंख्या पोचली १३४६ वर
शहरात ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या १३४६ एवढी झाली आहे. यात महापालिका हद्दीतील ११९९ रुग्ण, ग्रामीण भागातील १४० व बाहेर जिल्ह्यातील सात कोरोना रुग्ण आहेत, असे डॉ. नीता पाडळकर यांनी नमूद केले.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com