CORONAVIRUS : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने कसली कंबर

मधुकर कांबळे
बुधवार, 1 जुलै 2020

  • संपर्कातील लोकांचे नमुने घेण्यासाठी ‘स्वॅब संकलन, आपल्या दारी’ मोहीम 
  • कोरोनाबाधित रूग्ण राहत असलेल्या घरापासून २०० ते ५०० मीटरपर्यंतच्या घरांतील नागरिकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
  • महापालिकेची पथके संबंधित वसाहतींमध्ये जाऊन कोरोना चाचणीसाठी रहिवाशांच्या स्वॅबचे नमुने घेणार आहेत. 

औरंगाबाद : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून ‘स्वॅब संकलन, आपल्या दारी’ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधित रूग्ण राहत असलेल्या घरापासून २०० ते ५०० मीटरपर्यंतच्या घरांतील नागरिकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेची पथके संबंधित वसाहतींमध्ये जाऊन कोरोना चाचणीसाठी रहिवाशांच्या स्वॅबचे नमुने घेणार आहेत. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी (ता.३०) त्यांच्या दालनात नोडल अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत आयुक्तांनी कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना राबविण्यासंदर्भात सूचना दिल्या. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी ‘स्वॅब संकलन आपल्या दारी' अभियान राबवून संशयितांच्या लाळेचे जागेवरच नमुने घ्यावे. लाळेचे नमुने घ्यायचे आहे त्या भागात एक दिवस आधी नागरिकांना याबाबत सूचित करण्यात यावे. तसेच लाळेचे नमुने घेतल्यानंतर चाचणी अहवाल येईपर्यंत संबंधित संशयितांना त्यांच्या घरी ठेवावे आणि याबाबत त्यांना चाचणी अहवाल येईपर्यंत घरीच थांबण्याच्या सूचना द्या.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

ज्या घरात कोरोना रुग्ण सापडेल त्या घराच्या २०० ते ५०० मीटर परिसरात येणारे सर्व लोकांच्या चाचण्या करा, लोकांची गर्दी न करता एकेकाला बोलावून लाळेचे नमुने घ्या, ज्या शहर बस रुग्णांची ने-आण करणार आहेत त्यांच्या समोरील भागात स्पष्ट दिसेल, असे स्वॅब कलेक्शन आपल्या दारी अशा नावाचे बोर्ड लावावेत असे निर्देश दिले. बैठकीत अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, शहर अभियंता एस. डी. पानझडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, विधी सल्लागार तथा टास्क फोर्स प्रमुख अपर्णा थेटे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आदींची उपस्थिती होती. 

 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

कॉन्टेकट मॅपिंगसाठी दहा पथके 

शहराच्या कॉन्टॅक्ट मॅपिंगसाठी १० पथकांची निर्मिती करण्याची सूचना आयुक्तांनी केली. त्यानुसार प्रत्येक पथकांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यासह पाच सदस्य राहतील. प्रत्येक पथकाला रुग्णांना ने-आण करण्यासाठी एक स्मार्ट शहर बस उपलब्ध करून देण्यात यावी. पुढच्या १५ दिवसांसाठी कॉन्टॅक्ट मॅपिंगचा आराखडा सादर करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. प्लाझ्मा थेरेपीसाठी जेवढे रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत त्यांचा मोबाईल क्रमांक, पत्ता आदी तपशीलाचे डिजिटल रेकॉर्ड ठेवण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत. तसेच अँटीजन फेसिलिटी उभारण्यात यावी आणि २० हजार आरटीसीपीआर किट मागवुन घ्यावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. 

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

प्रत्येक हाऊसिंग सोसायटीत समिती 

प्रत्येक हाऊसिंग सोसायटीत कोरोना प्रतिबंधक समिती करावी. या समितीचा अध्यक्ष सोसायटी अध्यक्षाला करण्यात यावे. या समितीचे सदस्य सोसायटीतील राहणारे लोक कोणाला भेटले, कुठे जाऊन आले इत्यादी बाबींची नोंद घेतील. या मुळे कॉन्टेकट ट्रेसिंगसाठी मदत होईल. तसेच या समितीने पल्स ऑक्सिमिटर आणि थर्मल गन ठेवावी आणि सोसायटीतले लोकांचे शरीरातील ऑक्सिजनची पातळी आणि तापाची दिवसाआड चाचणी करून रीडिंगची नोंद ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Coronavirus swab collection home to home