औरंगाबादेतही ड्रग्जचा काळाबाजार ! 

drugs.jpg
drugs.jpg

औरंगाबाद : अभिनेता सुशांत आत्महत्या प्रकरणानंतर ड्रग्जचा काळाबाजार समोर आला असुन केवळ बॉलीवुड आणि मुंबईतच नव्हे तर औरंगाबादेतही अमली पदार्थाचा व्यवहार सुरुच असल्याचा भांडाफोड झाला आहे. मुंबईमार्गाने औरंगाबादेत आलेल्या एका कारमधुन पोलिसांनी हे अमली पदार्थ जप्त केले. ही कारवाई पोलिस आयुक्त कार्यालयातील पथकासह वेदांतनगर पोलिसांनी मंगळवारी (ता. २९) दुपारी बाराच्या सुमारास पंचवटीचौक येथे केली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, आशीक अली मुसा कुरेशी (वय ४१, रा. कुर्ला, मुंबई) व नुरोद्दीन बद्रोद्दीन सय्यद (वय ४१, रा. भारतनगर, बांद्रा मुंबई) अशी संशयितांची नावे आहेत. मुंबई रोडकडून शहरातील रेल्वेस्थानकाकडे एका चारचाकी वाहनातून काहीजण मॅफेडॉन व चरस शहरात आणत असल्याची माहिती पोलिस आयुक्तालयात कार्यरत सहायक पोलिस उपनिरीक्षक राहूल रोडे यांना समजली. 

त्यांनी पथकासह पंचवटी चौकात पाळत ठेवली व वाहन तपासणी सुरु केली. त्यावेळी संशयित कारचीही तपासणी केली असता आतमध्ये अमली पदार्थ आढळले. यात ५२ हजार रुपयांचे १३ ग्रॅम मॅफेडॉन व ११हजार दोनशे रुपयांचे २८ ग्रॅम १०० मिली चरस होते. ते पोलिसांनी जप्त करुन दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या दोघांना अटक करण्यात आली अशी माहिती वेदांतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहूल रोडे यांनी दिली. संशयितांकडून पोलिसांनी कार, मोबाईल, रोख रक्कम व ड्रग्ज असा ५ लाख ९९ हजार दोनशे रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई रोडे यांच्यासह उपनिरीक्षक सतीष भोसले, आर. टी. भदरगे, सहायक फौजदार सय्यद हनिफ कलंदर पठाण, मंगेश अभंग, शेख अस्लम, मोहन पाटील, संपाळ, गौर, कऱ्हाळे यांनी केली. 

(संपादन-प्रताप अवचार)
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com