पैठणमध्ये घरी बोलवून नगरसेविकेच्या भावावर चाकूने खुनी हल्ला, हल्लेखोरांचा शोध सुरु

Paithan Crime News
Paithan Crime News

पैठण (जि.औरंगाबाद) : भांडण मिटविल्यानंतर घरी बोलवून एका नगरसेविकेच्या सख्ख्या भावावर चाकुने खुनी हल्ला केल्याची घटना शहरातील संतनगर या भागात शुक्रवारी (ता.नऊ) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव जालिंदर आडसुल (वय ४०) असे असुन नारळा प्रभागातील शिवनगर येथील नगरसेविका माया आडसुल यांचा भाऊ आहे. जखमी जालिंदर आडसुल यांना औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 


आपापसातील वाद असल्याचे कारण या घटनेमागे सांगितले जात असुन हा वाद मिटल्यानंतर जालिंदर आडसुल यांना संत नगर येथे घरी बोलावून घेण्यात आले व त्यांच्यावर अचानक हल्ला करुन गंभीर जखमी केले. या हल्ल्यात छाती, पोट व पाठीवर चाकुने वार केले असल्याची माहिती मिळाली असुन पोलिस ठाण्यात जखमीच्या नातेवाईकांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांची कार्यवाही सुरु असल्याचे समजते. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच नागरिक व नातेवाईकांनी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली. पोलिसांनी या हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी गोरख भामरे, पोलिस निरीक्षक किशोर पवार, सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव, फौजदार रामकृष्ण सागडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान या खुनी हल्ल्या मागील नेमके कारण समजु शकले नाही. या कारणांचा ही पोलिस तपास करीत आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती. 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com